संध्याकाळच्या नाश्ताला काय खायचे असा बराच वेळा प्रश्न पडतो. आपल्या समोर शेवपुरी, पाणीपुरी असे विविध ऑप्शन असतात. पण तुम्ही कधी शेवपुरी सँन्डविच ट्राय केले आहे का? याचीच रेसिपी आपण पाहणार आहोत.
साहित्य-
-3 बटाटे उकडून घेतलेले
-1 टोमॅटो
-1 टीस्पून चाट मसाला
-1 कांदा
-चवीनुसार मीठ
-8 ब्रेड स्लाइस
-5 टेबलस्पून पूदिना चटणी
-5 टेबलस्पून आंबटगोड चटणी
-1 टेबलस्पून तूप
-कोथिंबीर
-1/2 कप शेव
-10 पाणीपुरीच्या पुऱ्या
कृती-
-सर्वात प्रथम बटाटे उकडून बारीक करून घ्या. आता कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. पुऱ्यांचा चुरा करून मीठ,चाट मसाला व सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
-असे केल्यानंतर ब्रेडला कोथिंबीर, मिर्च्यांची चटणी लावून घ्या. आता त्यावर तयार केलेले मिश्रण लावा आणि वरून चाट मसाला स्प्रिंकल करा.
-आता टोस्ट सँन्डविचचे भांडे घेत त्याला बटर लावून ते दोन्ही बाजूंनी व्यवस्थितीत भाजा. अशा प्रकारे तयार होईल तुमचे शेवपुरी सँन्डविच.
हेही वाचा- Nacho Chips : तांदळाच्या पिठापासून बनवा ‘नाचो चिप्स’