डब्ब्याला दररोज कोणती भाजी करावी हे कळत नाही. त्यामुळे बहुतांशवेळा आपण झटपट होणाऱ्या काही भाज्या करतो. त्यापैकीच एक म्हणजे तुम्ही डब्ब्याला चटपटीत आणि पटकन होणारी अशी मुळ्याची भाजी करू शकता. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य-
1 लांबट आकाराचा मुळा
2 टेबलस्पून तेल
1 टेबलस्पून लाल तिखट
1 टीस्पून कांदा लसूण मसाला
1/4 टीस्पून हळद
1/4 टीस्पून हिंग
1/2 टीस्पून जिरे
1/2 टीस्पून मोहरी
1 टीस्पून धने पूड
चवीनुसार मीठ
1 टोमॅटो
कृती-
सर्वात प्रथम तुम्ही मुळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर लहान मोठ्या किंवा गोल चकत्या कापून घ्या आणि मोठ्या बाऊल मध्ये काढा. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यानंतर त्यात मुळ्याच्या गोल चकत्या टाका आणि त्या परतून घ्या. आता त्यात साहित्यात घेतलेले मसाले टाका.
झाकण ठेवून पंधरा मिनिटे मंद गॅसवर, वाफेवर शिजवून घ्या. असे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, त्यात पाणी घालू नये.कारण मुळ्याला पाणी सुटते. अशा पद्धतीने तुमची तयार होईल चटपटीत मुळ्याची भाजी.
हेही वाचा- Recipe : गावरान पद्धतीने बनवा दोडक्याची भाजी