Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenRecipe : चटपटीत कोळंबी भजी

Recipe : चटपटीत कोळंबी भजी

Subscribe

आत्तापर्यंत तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस यांसारखे कोळंबीपासून तयार केलेले अनेक पदार्थ तयार केले असतील. आज आम्ही तुम्हाला कोळंबी भजी कशी करायची हे सांगणार आहेत.

साहित्य :
 • 1 वाटी सोललेली कोळंबी
 • 2 कांदे बारीक चिरलेले
 • 1/4 चमचा हळद
 • आलं-लसूण पेस्ट
 • 1/2 चमचा लाल तिखट
 • 1 वाटी चनाच्या डाळीचे पीठ
 • मीठ चवीनुसार
 • तेल
कृती :

Prawn Pakoda

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुऊन घ्यावी आणि जर मोठी कोळंबी असेल त्याचे तुकडे करावे.
 • त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद लावून थोडा वेळ झाकून ठेवा.
 • थोड्यावेळाने त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि बेसन पीठ मिक्स करावे.
 • थोडं पाणी ओतून भज्याचे पीठ नीट मिक्स करावे.
 • आता गरम तेलाच भजी सोडावी आणि छान भाजून घ्यावी.
 • गरमा-गरम तयार कोळंबी भजी सर्वांना सर्व्ह करावी.

 

- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -

Manini