Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी काजू उसळ

Recipe : टेस्टी काजू उसळ

Subscribe

सतत त्याच त्याच भाज्या खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही काजूची उसळ नक्की ट्राय करायला हवी.

साहित्य :

 • दीड कप ओले काजू
 • 2 कांदे
 • 4 लसणाच्या पाकळ्या
 • 3 हिरव्या मिरच्या
 • 1 चमचा गरम मसाला
 • 2 कोकम
 • 1/4 कप ओलं खोबरं
 • कोथिंबीर सजावटीसाठी
 • मीठ चवीनुसार
 • 2 चमचा तेल फोडणीसाठी
 • 1 चमचा हळद
 • 1/4 चमचा हिंग
 • 2 चमचे मोहरी

कृती :

Goan Kaju Curry Recipe (Spicy Goan Cashew Nut Curry) by Archana's Kitchen

- Advertisement -
 • सर्वप्रथम ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे साली सहज निघतील.
 • साली काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावे.
 • त्यानंतर कांदा बारीक चिरावा आणि लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात, मिरच्या चिरून घ्याव्यात.
 • त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद आणि हिंग घालावी.
 • नंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देऊ नये.
 • त्यानंतर कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा. मग त्यात काजू घालून जेवढी पातळ उसळ हवी तेवढे पाणी घालावे.
 • काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे आणि त्यात गरम मसाला, कोकम, मीठ, गूळ घालावं.
 • त्यानंतर त्यात खोबरं घालून ढवळावे आणि पोळीसोबत सर्व्ह करावे.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini