Saturday, April 13, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी सोया टिक्की

Recipe : टेस्टी सोया टिक्की

Subscribe

तुम्ही आत्तापर्यंत आलू टिक्की, पनीर टिक्कीचा आस्वाद घेतला असेल, या वेळी तुम्ही पौष्टिक अश्या सोया टिक्कीचा आस्वाद नक्की घेऊन बघा.

साहित्य :

  • 1/2 किलो बटाटा (उकडलेला)
  • 1 लहान कप वाटाणे (उकडून मॅश केलेले)
  • 1 कप सोया तुकडे
  • 5-6 हिरव्या मिरच्या
  • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
  • 1 चमचा हळद
  • 1 चमचा गरम मसाला
  • कोथिंबीर
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

कृती :

Soya Cutlet (No Potato): High-Protein, Low-Carb Soya Tikki - ãhãram

  • सर्वप्रथम सोयाचे तुकडे 10 मिनिट गरम पाण्यात उकळून घ्या आणि त्यानंतर सोया पिळून घ्या.
  • आता एका भांड्यात सोया मॅश करा.
  • दुसरीकडे एका भांड्यात उकडलेला बटाटा मॅश करा. त्यामध्ये वाटाणे (मॅश केलेले), हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला आणि मॅश केलेला सोया एकत्र करून घ्या.
  • आता तळाहातावर तेल लावून या मिश्रणाचे गोळे करून त्याला टिक्कीचा आकार द्या.
  • आता कढई तेल ओता, तेल गरम होताच त्यामध्ये ही टिक्की लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  • आता एका प्लेटमध्ये काढून सॉससोबत सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini