पावसाळ्यात आपल्याला गरमागरम चटपटीत पदार्थ खायची खूप इच्छा होती. मात्र वारंवार तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही पिझ्झा पॉकेट नक्कीच ट्राय करून पाहा.
साहित्य :
- 2 चमचे मका
- 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
- 2 चमचे शिमला मिरची
- टोमॅटो सॉस
- ब्रेड स्लाइस (गरजेनुसार)
- 1-2 चमचे बटर
- 3-4 ऑलिव्ह
- किसलेला मोझरेला चीज (गरजेनुसार)
- पिझ्झा सॉस (गरजेनुसार)
- मीठ (चवीनुसार)
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर टाकून त्यात कांदा छान परतून घ्या.
- आता त्यामध्ये मका, शिमला मिरची आणि मीठ टाकून परता.
- त्यानंतर त्यामध्ये पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस घालून सर्व मिश्रण छान परतून घ्या.
- आता या भाज्या शिजल्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- आता त्यामध्ये मोझेरेला चीज आणि ऑलिव्ह मिक्स करा.
- आता ब्रेडच्या बाजू कापू घ्या आणि त्यामध्ये तयार केलेले मिश्रण भरून चांगले पॅक करा.
- दुसरीकडे कढईत तेल गरम करून ते स्टफ केलेले ब्रेड मध्यम आचेवर तळून घ्या.
- खरपूस भाजल्यानंतर पिझ्झा पॉकेट एका प्लेटमध्ये काढून टोमॅटो सॉससोबत सर्वांना सर्व्ह करा.
हेही वाचा :
Ice Cream Recipe : मुलांसाठी घरीच बनवा हेल्दी ‘ग्रेप्स आईस्क्रिम’
- Advertisement -
- Advertisement -