आत्तापर्यंत तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस, कोळंबी भजी यांसारखे कोळंबीपासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला कोळंबीचे पोहे कसे करायचे हे सांगणार आहेत.
साहित्य :
- 1 वाटी सोललेली कोळंबी
- 3-4 वाट्या जाड पोहे
- 2 कांदे बारीक चिरलेले
- 4-5 हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- लाल तिखट
- हळद
- जीरे
- मोहरी
- मीठ चवीनुसार
- तेल
- Advertisement -
कृती :
- सर्वप्रथम कोळंबीला हळद, लाल तिखट, मीठ लावून ठेवा. आणि पोहे भिजवून घ्या.
- आता गॅसवर कढई गरम करुन त्यात तेल टाका.
- तेल तापल्यानंतर जीरे, मोहरी घालावा.
- लगेच त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता, हळद घालावी.
- नंतर त्यात कोळंबी घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे.
- थोडा वेळ झाकण ठेवून कोळंबी छान शिजू द्यावी.
- कोळंबी शिजल्यानंतर त्यात पोहे घालून चांगले परतून घ्या.
- आता चवीनुसार मीठ घाला.
- तयार गरमागरम पोह्यांवर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :