आता तेलकट समोश्याला म्हणा बाय बाय; ट्राय करा बेक समोसा

आपल्यापैकी अनेकांना समोसा खायला खूप आवडतो. मात्र प्रत्येकवेळी तेलकट समोसा खाणं आरोग्यासाठी घातक ठरतं. मग अशावेळी बेक समोसा नक्कीच ड्राय करु शकता.

बेक समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • २ कप मैदा
 • २ चमचे तेल
 • २ उकडलेले बटाटे
 • १ कप वाटाणे
 • १ लहान चमचा हळद
 • १ लहान चमचा लाल मिरची पावडर
 • ३ चमचे लाल मिरची पावडर
 • २ चमचा धना पावडर
 • मीठ चवीनुसार
 • पाणी आवश्यकतेनुसार

कृती :

 • सर्वप्रथम मैद्यामध्ये तेल आणि मीठ टाकून कणीक मळून घ्या.ॉ
 • एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये जीरे, गरम मसाला, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धना पावडर, मीठ चवीनुसार आणि उकडलेला बटाटा परतून घ्या.
 • हे मिश्रण थंड झाल्यावर एकीकडे कणकेची बारीक पुरी लाटून घ्या आणि त्या पुरीचे मधून दोन भाग करा.
 • या अर्ध्या भागात तयार सारण भरून त्याला समोश्यासारखा आकार द्या.
 • आता काहीवेळ एका कुकरला गरम होण्यासाठी ठेवा.
 • गरम कुकरमध्ये खाली मीठ टाका आणि त्यावर स्टँड ठेवा.
 • गॅस मध्यम आचेवर ठेवून त्या कुकरमधील स्टँडवर एक तेल प्लेट ठेवा.
 • प्लेटला तेल लावून त्यावर समोसे ठेवून कुकरवर एक झाकण ठेवा.
 • 15-20 मिनिट समोसे छान बेक होतील.
 • त्यानंतर समोसे सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

तुम्हीसुद्धा पॅकबंद अन्नपदार्थांचा वापर करता का? आजच थांबा अन्यथा…