Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenRecipe: उरलेल्या भातापासून बनवा स्वादिष्ट असा फ्राइड राइस

Recipe: उरलेल्या भातापासून बनवा स्वादिष्ट असा फ्राइड राइस

Subscribe

फ्राइड राइस ही एक एशियाई डिश आहे जी अगदी सहज तुम्ही बनवू शकता. कमी मेहनत आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी फार वेळ लागत नाही. अशातच तुमच्याकडे रात्रीचा उरलेला भात असेल तर त्यापासून स्वादिष्ट असा फ्राइड राइस बनवू शकता. चला तर पाहूयात यासाठी लागणाऱ्या साहित्य आणि कृती.

साहित्य-
-1 वाटी उरलेला भात
-1 वाटी चिरलेला कांदा
-लसूण गरजेनुसार
-1 चिरलेला गाजर
-अर्धा वाटी कापलेली फरसबी
-अर्धा वाटी शिमला मिर्ची
-अर्धा वाटी कोबी
-1/2 चमचा चिली पावडर
-1/2 चमचा विनेगर
-1/2 चमचा टोमॅटो सॉस
-फ्राइड राइस मसाला

- Advertisement -

कृती-
सर्वात प्रथम एक पॅन घेत त्यात तेल घेऊन ते गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण, बारीक चिरलेला कांदा टाकून तो लालसर होईपर्यंत भाजा. आता कांदा व्यवस्थितीत भाजल्यानंतर त्यात फसरबी, गाजर, कोबी, शिमला मिर्ची टाकून पुन्हा ते व्यवस्थितीत भाजा. पण यावेळी त्या भाज्या पूर्णपणे शिजवू नका. 5 मिनटांनी त्यात टोमॅटो सॉस, विनेगर, चिली पावडर आणि फ्राइड राइस मसाला टाकून भाज्यांसोबत ते व्यवस्थितीत मिक्स करा. आता तयार झालेल्या फ्राइड राइसच्या मसाल्यात तुमचा उरलेला भात टाकून तो परतून घ्या आणि वरुन झाकणं ठेवा. पुढील 5-7 मिनिटांसाठी तो तसाच ठेवा. आता झाकणं काढून पुन्हा भात परतवा. अशा पद्धतीने तुमचा स्वादिष्ट असा फ्राइड राइस तयार होईल.

- Advertisement -

हेही वाचा- Aloo Momos : बटाट्याचे चविष्ट मोमोज, जाणून घ्या सोपी रेसिपी

- Advertisment -

Manini