Tuesday, November 26, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthHair Care Tips : बदलत्या ऋतूमुळे होणारा हेअर फॉल या उपायांनी कमी...

Hair Care Tips : बदलत्या ऋतूमुळे होणारा हेअर फॉल या उपायांनी कमी करा

Subscribe

बदलत्या हवामानामुळे आरोग्यासह आपल्या त्वचेची काळजी घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. या काळात आपल्या आरोग्याप्रमाणे आपल्या केसांवर किंवा स्किनवर देखील अनेक बदल होत असतात. या ऋतूंमध्ये आपण आपल्या केसांची किंवा त्वचेची योग्यरित्या काळजी घेतली नाही तर अनेक समस्या उद्भवू लागतात हवामानात काही बदल झाले, तर त्याचा परिणाम आपल्या केसांवर देखील होतो, केस मोठ्या प्रमाणात गळतात , खराब होऊ लागतात. आज आपण जाणून घेऊयात, बदलत्या ऋतूमुळे होणारा हेअर फॉल कसा कमी होऊ शकतो.

मोहरी आणि कडुलिंबाच

बदलत्या हवामानामुळे आपले केस मोठ्या प्रमाणात गळतात त्यामुळे तुम्ही केस गळतीसाठी मोहरी आणि कडुलिंबाच्या तेलाने मालिश करू शकता.

- Advertisement -

योग्य आहार

केस गळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, आहार जर आपला आहार पोषक आणि पौष्टिक नसेल तर आपली केस कमकुवत होऊन लगेच गळू शकतात. केसांसाठी प्रोटीन झिंक, बायोटिन, आयर्न, आणि ओमेगा-3 युक्त पदार्थ खूप महत्वाचे असतात. तसेच तुम्ही आहारात अंडी, बदाम, बीज, हिरव्या पालेभाज्या मासे यांचा समावेश करू शकता.

केसांची निगा राखा

केसांची योग्यरित्या निगा राखा आठवड्यातून एकदा कोमट पाण्याने केस धुवा. जसे की खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह तेल केसांना लावा. केस ओले असताना जास्त ब्रश करू नका.

- Advertisement -

ताण टाळा

स्ट्रेसमुळेही केस गळण्याचे प्रमाण वाढते. ध्यान, योग किंवा मेडिटेशन करून ताण कमी करा.

घरगुती नैसर्गिक उपाय

केस जास्त प्रमाणात गळत असतील तर मेथीचे दाणे रात्रभर भिजवून याची पेस्ट तयार करून घ्या. आणि केसांना लावा. तसेच तुम्ही जास्वंदाच्या फुलांची पेस्ट बनवून लावा.आवळा केसांना लावल्याने केस गळणे कमी होते.

केमिकल प्रोडक्टकचा टाळा

जास्त केमिकयुक्त प्रोडक्टकचा वापर करू नका. केमिकल प्रोडक्टकसने आपले केस त्वरित खराब होऊ शकतात.

अशा प्रकारे तुम्ही बदलत्या ऋतूमध्ये हेअर फॉल थांबवू शकता.

हेही वाचा : Health Tips : वजन कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini