Friday, September 29, 2023
घर मानिनी Health सांधे आणि अंगठ्यात जमा झालेले Uric Acid 'या' गोष्टींनी होईल दूर

सांधे आणि अंगठ्यात जमा झालेले Uric Acid ‘या’ गोष्टींनी होईल दूर

Subscribe

आपल्या खाण्यापिण्याचा शरिरावर अत्याधिक प्रभाव पडतो. जर तुम्ही गरजेपेक्षा अधिक प्युरिन पदार्थांचे सेवन करत असाल तर युरिक अॅसिड वाढू लागते. युरिक अॅसिड एक प्रकारचे वेस्ट प्रोडक्ट आहे जे प्युरिन ब्रेक झाल्यास तयार होते. सर्वसामान्यपणे किडनी युरिक अॅसिडला फिल्टर करुन काढून टाकते. मात्र त्याचा स्तर अधिक असेल तर युरिक अॅसिड फिल्टर होत नाही आणि शरिरात पसरू लागते. युरिक अॅसिडचे क्रिस्टल्स सांधे आणि अंगठ्यात जमा होऊ लागतात. त्यामुळे गाउट (Gout) ची समस्या होते. अशातच हाय युरिकला कमी करण्याची गरज असते. त्यामुळे आपण असे काही फूड्स पाहणार आहोत ज्याच्या मदतीने युरिक अॅसिड कमी होईल.

सफरचंद

- Advertisement -


सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असतात. यामुळे युरिक अॅसिड कमी करण्यास मदत होते. यामध्ये मैलिक अॅसिड सुद्धा असते, जे युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करते. दररोज सफरचंदाचे सेवन केल्याने युरिक अॅसिडचा स्तर कमी होते.

बेरीज

- Advertisement -


बेरीज जसे स्ट्रॉबेरीज, ब्लुबेरीज आणि ब्लॅकबेरीज मध्ये अँन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. याचे सेवन केल्याने युरिक अॅसिडमुळे होणारी सांधी दुखी दूर होऊ शकते. यामुळेच बेरीजमुळे हाय युरिक अॅसिड कमी करण्यास मदत होऊ शकते.

डाइट्री फायबर


डाइट्री फायबरमुळे युरिक अॅसिडला कमी करू शकते. युरिक अॅसिडला कमी करण्यासाठी डाएटमध्ये संत्र, ब्रोकोली, ओट्स, काकडी आणि गाजरचे सेवन करू शकता. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी केळं सुद्धा फायदेशीर ठरेल.

ग्रीन टी

Green Tea

खाण्यापिण्यात ग्रीन टी चा समावेश करू शकता. ग्रीन टी मध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. यामुळे गाउटचा धोका कमी होतो.


हेही वाचा- दूधात तूप मिक्स करुन प्यायल्याने होतात हे फायदे

- Advertisment -

Manini