बरेचदा लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करतात. पण असे करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप हानिकारक असते. अशातच दिवसाची सुरुवात ही नेहमी गरम पाण्याने किंवा काढा पिऊन करावी. तसेच यापैकी तुम्ही काहीही जर करत नसाल तर वनस्पतींची पाने उकळून त्याचे पाणी रोज सकाळी प्यावे. तसेच या पानांचे सेवन आपल्या प्रत्येकाच्या पोटासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे ही पाने औषधी गुणधर्मांचा खजिना म्हणून ओळखली जातात. तसेच आता आपण जाणून घेणार आहोत नेमकी कोणती अशी पाने आहेत ज्यामुळे तुम्ही कधी आजारी पडणार नाहीत.
1.कडुलिंबाची पाने
कडुलिंब जरी चवीला कडू असला तरी शरीरासाठी तो जास्त गुणकारी आहे. कडुनिंबात जे घटक असतात ते शरीराला अतिशय फायदेमंद असतात. अँटी ऑक्सिडंट आणि अँटीफंगल हे घटक शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवतात. तसेच कडुलिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म जास्त असतात. हे तुमचे रक्त शुद्ध करतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.
2.कढीपत्त्याची पाने
तज्ज्ञांच्या मते, याचे कमी प्रमाणात सेवन केल्यास हजारो फायदे मिळू शकतात. याच्या सेवनाने बीपी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. वास्तविक, त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे बीपी व्यवस्थापित करण्यास तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
3. सेलेरियाची पाने
सेलेरीच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही पचनाशी संबंधित समस्यांना दूर ठेऊ शकतात. तसेच जर का तुमचे वजन अति प्रमाणात वाढत असेल तर सेलेरियाच्या पानाचे सेवन करा. यामुळे शरीराची सूज आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळेल.
4. तुळशीची पाने
तुळशीमध्ये अँटीऑक्ससिडंटचे प्रमाण जास्त असते. जे शरीराला कोणत्याही समस्या पासून लांब ठेवते. तसेच तुळशीचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच याच्या सेवनामुळे कोणत्याही आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त राहत नाही.
________________________________________________________________________