अन्न हे पूर्णब्रम्ह आहे, त्यामुळे सहसा अन्न फेकून दिले जाते. उरलेले पदार्थ पुन्हा गरम करून खाणे आपल्या देशात सर्वसामान्य आहे. पण, काही पदार्थ असे असतात की, जे पुन्हा गरम केल्यावर त्यांच्या पोषक घटकांमध्ये बदल होतो आणि त्याचे परिवर्तन विषारी घटकांमध्ये होते. असे पदार्थ खाल्याने आरोग्याच्या तक्रारी संभवतात. पोटदुखी, उलट्या, विषबाधा आणि अन्य आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे कोणते पदार्थ पुन्हा गरम करू नयेत हे आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत, जे पुन्हा गरम केल्याने शरीरासाठी विषासमान ठरू शकतात. जाणून घेऊयात, असे पदार्थ पुन्हा गरम करू नयेत.
भात –
आपल्यापैकी अनेकजणांना रात्री उरलेला भात पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. पण, तुमची ही सवय शरीरासाठी हानिकारक असते. कारण उरलेल्या भातामध्ये बैसिलस सेरेयस नावाचे बॅक्टेरिया असतात, जे विषबाधेच कारण बनू शकतात.
बटाटा –
बटाटा जास्त वेळ बाहेर ठेवल्याने त्यात बॅक्टेरीया वाढू लागतात. जेव्हा तुम्ही हे बटाटे पुन्हा गरम करता तेव्हा विषासमान होतात.
पालक –
पालकापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. पण, पालक तुम्ही वारंवार गरम केलेत आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पालक पुन्हा गरम केल्यावर त्यात नायट्रोसमाईनमध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.
उकडलेली अंडी –
उकडलेली अंडी पुन्हा गरम करून खाऊ नयेत. असे केल्याने त्यातील प्रोटीन्स शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.
कांदा भजी –
तळलेले पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील तेलात बदल होतो आणि त्यातून फ्री रॅडिकल्स तयार होतात. जे शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे कांदा भजीसारखे पदार्थ खाऊ पुन्हा तळून खाऊ नयेत.
मधरूम –
प्रोटीन्सचा स्त्रोत म्हणून मशरूमकडे पाहीले जाते. मशरूम सुद्धा पुन्हा गरम करून खाल्याने ते विषासमान होतात. असे मशरूम खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.
चिकन –
चिकन वारंवार गरम केल्यास त्यात बॅक्टेरीया वाढू लागतात. ज्यामुळे तुम्हाला पोट बिघडणे, अपचन, जुलाब, उलट्या सारख्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे चिकन- मटण सारखे पदार्थ फ्रेश खावेत.
बीट –
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी बीट खाणे फायदेशीर असते. बीटाच्या सेवनाने केस, आरोग्य, त्वचा सर्वांनाच लाभ होतो. पण, असे प्रोटीन्सयुक्त बीट पुन्हा गरम करून खाऊ नयेत.
सीफूड –
सीफूड पुन्हा गरम केल्याने शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय याची चवही बदलते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde