नवं रिलेशनशिप, नवं प्रेम एक विलक्षण अनूभव देणारे असते. प्रेम, आपूलकी, जिव्हाळा या सर्व गोष्टी प्रेमात पडलेल्या व्यक्तीला नक्कीच अनूभवायला मिळतील. पण, नव्या रिलेशनशिमध्ये अजून एक गोष्टीची भिती असते ते म्हणजे पार्टनरसोबत बोलायची. तुमचं चूकीचे बोलणे तुमच्या रिलेशनशिपवर नकारात्मक परिणाम देणारे ठरू शकते.
पार्टनरसोबत चॅटिंग करताना पुढील गोष्टी लक्षात घ्या
हल्ली बरेच कपल दिवसरात्र चॅटिंग करताना दिसतात. पण, तुमची चूकीची चॅटिंग तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे जाणून घेऊयात पार्टनरसोबत चॅटिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
पार्टनरसोबत प्रामाणिकपणे राहा आणि कायम मोकळेपणाने बोला. तुम्ही जसे आहात तसे राहा. उगाचचं चॅटिंग करताना बडेजाव करणे टाळा.
पार्टनरशी त्याच्या आवडी-निवडी, छंद याविषयी मोकळेपणाने बोला. तसेच चॅटिंग करताना तुमच्या रिलेशनशिपविषयी सकारात्मक राहा.
चॅटिंग करताना पार्टनरची मोकळ्या मनाने आणि खरी प्रंशसा करा.
पार्टनर काय बोलत आहे, त्याचे म्हणणे काय आहे हे शांतपणे ऐकून घ्या. पुर्ण ऐकून घेतल्यावर विचारपूर्वक उत्तर द्या.
एकमेकांचे विचार वेगळे असू शकतात. त्यामुळे बोलताना एकमेकांच्या भावनांचा विचार नक्की करा.
पार्टनरसोबत बोलताना केवळ स्वत:च बोलू नका. समोरच्याला बोलण्याची संधी द्या.
चॅटिंग करताना वेळेलाही महत्व आहे. त्यामुळे पार्टनरला मेसेज करण्याआधी वेळ पाहायला विसरू नका.
रिलेशनशिपमध्ये फोटो, व्हिडीओ शेअर करताना काळजी घ्या.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde