जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आई-वडिलांन त्यांच्या लग्नाची चिंता सतावू लागते. मुलगी असो किंवा मुलगा त्याच्यासाठी लाइफ पार्टनर शोधण्यास सुरुवात केली जातो. मात्र बदलत्या काळानुसार तरुण मंडळी लवकर लग्न करण्यास नकारच देतात. प्रत्येकाचेच स्वप्न हे केवळ लग्न करण्याचे नसते.बहुतांश घरातील मंडळी जेव्हा लग्नाचा विषय काढतात तेव्हा मुलं त्यांना स्पष्टपणे त्या गोष्टीसाठी नकार देतात. अशातच तुमची मुलगी सुद्धा लग्नासाठी नकार देत असेल तर पुढील काही कारणे असू शकतात.
स्वातंत्र्य संपेल याची भीती
बहुतांश तरुणांना असे वाटते की, त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. ते लग्नाऐवजी उत्तम नोकरी आणि यशाला फार अधिक महत्त्व देऊ पाहतात. मुलगा असो किंवा मुलगी त्यांना स्वातंत्र्य संपेल म्हणून त्यांना कोणत्याही नात्यात अडकणे आवडत नाही.
एक्स पार्टनरच्या कारणास्तव
जर एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी नकार देत असेल तर त्यासाठी त्याचे एखादे जुने रिलेशनशिप हे सुद्धा कारण असू शकेल. ब्रेकअप नंतर पार्टनरला पूर्णपणे विसरुन शकत नसल्याने लग्नासाठी मुलगी नकार देत असावी.
जबाबदाऱ्यांपासून दूर राहणे
लग्नानंतर आयुष्यात काही बदल होतात. लग्नानंतर सिंगल लाइफमध्ये बदल होऊ शकतात. तरुणांना असे वाटते की, लग्नानंतर जबाबदाऱ्या येतील. सकाळी मनानुसार उठणे, मित्रमैत्रीणींसोबत पार्टी करणे अशा काही गोष्टी करता येणार नाहीत याची भीती वाटत राहते. त्यांना असे वाटते की, लग्नानंतर पार्टनरच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. पार्टनरच्यानुसार त्यांचे रुटीन होईल. त्यामुळेच ते लग्नासाठी नकार देत असतील.
हेही वाचा- रिलेशनशिपमध्ये मानसिक त्रास सहन करताय, तर असे सोडवा वाद