Monday, December 4, 2023
घरमानिनीRelationshipनवरा तुमचे ऐकत नसेल तर करा 'हे' काम

नवरा तुमचे ऐकत नसेल तर करा ‘हे’ काम

Subscribe

वैवाहिक आयुष्यात संवाद असणे अत्यंत गरजेचे असते, कारण यामुळे तुमच्या नात्याला आधार मिळतो. जो पर्यंत नवरा-बायको आपल्या भावना एकमेकांना सांगत नाहीत तो पर्यंत नाते मजबूत होणार नाही. उघडपणे, स्पष्टपणे एकमेकांशी बोलणे हे एखाद्या नात्याचा महत्त्वाचा पैलू आहे. अशातच जेव्हा नवरा तुमचे काही ऐकत नाही,तुमची काळजी करत नाही तेव्हा हे नाते कसे सावरायचे असा सतत विचार मनात येत राहतो. अशातच पुढील काही टिप्स तुम्ही जरुर लक्षात ठेवू शकता.

-बोलण्यासाठी वेळ काढा
एक अशी जागा किंवा वेळ निवडा ज्यावेळी तुमच्या दोघांना एकमेकांसाठी निवांत वेळ मिळेल.तेथे तुम्ही उघडपणे एकमेकांशी बोलू शकता. लक्षात ठेवा, कामाच्या वेळी आपल्या गंभीर आणि नाजूक भावना नवऱ्यासोबत शेअर करू नका.

- Advertisement -

When Spouses Grieve Differently - Marriage Missions International

-काळजीपू्र्वक ऐका
नवरा तुमचे ऐकत नसेल यामागील असे सुद्धा एक कारण असू शकते की, तुम्ही सुद्धा तो बोलत असलेल्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकत नसाल. जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांशी बोलता तेव्हा गांभीर्याने एकमेकांचे ऐकावे. एकमेकांच्या बोलण्याला योग्य प्रतिक्रिया द्याव्यात.

- Advertisement -

-स्पष्टपणे बोला
जे तुम्हाला सांगायचे आहे त्याबद्दल नवऱ्याला स्पष्टपणे सांगा. आपले विचार स्पष्टपणे नवऱ्यासमोर मांडा. आपल्या भावना किंवा विचार मांडताना तुमचा आत्मसन्मान संभाळा.सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करणे टाळा.

नवऱ्याला समजून घ्या
असे वातावरण तयार की, तुम्ही नवऱ्याला समजून घेत आहात. जेव्हा तुम्हाला तो असे करताना पाहिल तेव्हा त्याला सुद्धा तुमच्याबद्दल आदर वाटेल.


हेही वाचा- बॉयफ्रेंडसोबत कधीच शेअर करू नका ‘या’ गोष्टी

 

- Advertisment -

Manini