Thursday, May 25, 2023
घर मानिनी Relationship मेरे सय्याजी से Breakup कर लिया...; दुःखातून सावरण्यासाठी 'या' आहेत टीप्स

मेरे सय्याजी से Breakup कर लिया…; दुःखातून सावरण्यासाठी ‘या’ आहेत टीप्स

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा त्यात पार्टनरचे सुख-दु:ख, शेअरिंग-केअरिंग असते. गोडीगुलाबीने चाललेल्या नात्यात वाद होणे ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु पार्टनरने एखाद्या कारणामुळे तुमच्यासोबत नाते मोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अचानक धक्का बसतो. त्यावेळी कळत नाही नक्की काय करावे. पार्टनरच्या आठवणी, त्याचे बोलणे, त्याच्या सोबतचा घालवलेला वेळ वारंवार डोळ्यांसमोर येत राहतो. एकूणच याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. ब्रेक अपचे दु:ख मनात बाळगत राहिल्याने आपण आयुष्यातील पुढचा टप्पा कधीच गाठू शकत नाही. त्यामुळे या स्थितीतून नक्की कसे बाहेर पडावे याच संदर्भातील काही टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

-जुन्या आठवणींचा सतत विचार करु नका
ब्रेकअप नंतर जुन्या आठवणींचा सतत विचार करत बसू नका. या आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला होणार नाही पण त्यांचा विचार येऊ नये म्हणून तुमचे मनं एखाद्या कामात किंवा आवडीच्या गोष्टीत रमवा.

- Advertisement -

-मित्रपरिवारासोबत वेळ घालवा
ब्रेकअपनंतर मनात विविध विचार येत राहतात. यासाठी गरजेचे आहे की, ब्रेकअप नंतर तुम्ही एकटे राहू नये. यावेळी तुमच्या मित्रपरिवारासोबत वेळ घालवा. तुमचे मन मोकळं करा. ब्रेकअपनंतर टेंशन फ्री राहण्याचा उत्तम मार्ग आहे. तसेच सकारात्मक विचार करा.

- Advertisement -

-हास्यात्मक व्हिडिओ किंवा शो पहा
ब्रेकअपनंतर लोक खाणं-पिणं सोडून देतात. काही लोक हसत सुद्धा नाही. प्रत्येक वेळी निराश राहतात. पण असे करण्यापासून दूर रहा. असे केल्याने तुम्ही शारीरिकच नव्हे तर मानसिक रुपात ही कमजोर होता. ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे जाणे फार महत्वाचे आहे. आपले दु:ख बाजूला ठेवून आधीसारखे निखळ हसण्यासाठी हास्यात्मक व्हिडिओ किंवा शो पाहू शकता.

-मनातील गोष्टी शेअर करा
बहुतांश लोक ब्रेकअपनंतर तणाव आणि डिप्रेशनच्या स्थितीत जातात. कारण तेव्हा स्वत:ला एकटे असल्यासारखे वाटते. आपल्या मनातील कोणत्याही गोष्टी शेअर करत नाही. पण ब्रेकअप नंतर टेंशन फ्री राहण्यासाठी भावना शेअर करणे फार गरजेचे आहे.

-योगा किंवा एक्सरसाइज करा
ब्रेकअप नंतर मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. अशातच मानसिक आजार दूर करण्यासाठी तुम्ही योगा आणि मेडिटेशन करु शकता. ब्रेकअपनंतर टेंशन मध्ये राहण्याऐवजी तुम्ही योगा किंवा एक्सरसाइज करुन फिजिकली आणि मानसिकरित्या सुद्धा स्ट्राँन्ग होऊ शकता.


हेही वाचा- नातं मजबूत करण्यासाठी थोड खोट बोलावं लागेल

- Advertisment -

Manini