Saturday, June 10, 2023
घर मानिनी Relationship पत्नीला माझे आई वडील नको...

पत्नीला माझे आई वडील नको…

Subscribe

असे म्हटले जाते की, लग्नानंतर मुलीचे खरं घर म्हणजे तिचे सासर. भारतीय समाजात जवळजवळ प्रत्येक महिलेला लग्नानंतर हिच गोष्ट ऐकवली जाते. तिच्याकडून अशी अपेक्षा केली जाते की, बालपणापासून ती ज्या लोकांसोबत राहिली आहे त्यांना सोडून एका नव्या परिवाराला तिने काही दिवसातच स्विकारावे. वास्तवात असे करणे एका महिलेसाठी थोडं कठीण असते. भले सासरची माणसं फार चांगली असतील पण तेथील काही गोष्टींमुळे समस्या येऊ शकते.

लग्नानंतरच्या काही दिवसांनी असे होते की, नवऱ्याच्या घरची मंडळी नव्या सुनेला ती परकीच मुलगी आहे असे मानतात. अशातच नवी सुन सुद्धा आपण या परिवारापासून वेगळे रहावे असे तिला वाटत राहते. पण जेव्हा ती हिच गोष्ट आपल्या नवऱ्याला किंवा सासरच्या मंडळींना सांगते तेव्हा ते तिचा राग करु लागतात. थेट तिच्यावर स्वार्थीचा टॅग लावला जातो. अशातच खरंच बायकोला स्वार्थी म्हणावे का? हेच आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

तज्ञ काय म्हणतायत?
तज्ञ असे म्हणतात की, लग्नानंतर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तिला या समस्येचा सामना करावा लागतो. जेथे जुनी पिढी आपल्या विचारांनी चालत असते तर दुसऱ्या बाजूला नवी पिढी आपल्या पद्धतीने विचार करते. अशातच गल्लत अशी होते की, दोन्ही पिढ्या लग्नानंतर होणारे बदल स्विकार करत नाहीत. यामुळे अहंकाराची भावना निर्माण होते. एक अशी स्थिती निर्माण होते ज्यावर सहज तोडगा काढणे शक्य होत नाही.

विभक्त होण्याचे कारण
नव्या सुनेला आपल्यापासून का विभक्त व्हायचे आहे हे जाणून घ्यावे. ती म्हणतेय म्हणून तिला लगेच स्वार्थी ठरवु नये. खरं कारण जाणून घेण्याचे काम नवऱ्याशिवाय दुसरं कोणीही करु शकत नाही. जर बायको सासरच्या मंडळींपासून वेगळे होण्याचे जेव्हा म्हणते कारण खुप त्यांच्यासोबत जमवून घेण्याचा जरी प्रयत्न केला तरीही तिला होत नसेल तर तिला स्वार्थी म्हणणे चुकीचे ठरेल. जर नात्यात ईगो क्लेशमुळे वाद झाले असतील तर यामध्ये दोघांची चूक आहे.

- Advertisement -

नवऱ्याने करावे हे काम
जर बायको सासरच्या मंडळींपासून वेगळे होण्याचे बोलत असेल तर नवऱ्याने त्यामागील नक्की कारण काय हे विचारावेच. पण दोघांमध्ये लहानसहान मतभेद असतील तर बायकोला समजावून सांगावे. एकत्रित आणि विभक्त राहण्याचे काय फायदे-तोटे आहेत हे सुद्धा बायकोला सांगावे.

नात्यात अॅडजेस्टमेंट गरजेचे
तुमचे नाते दीर्घकाळ टिकून रहावे म्हणून अॅडजेस्टमेंट तर करावीच लागते. लग्नानंतर काही जबाबदाऱ्या खांद्यावर पडतात. जर बायको सासरच्या मंडळींसोबत खुश नसेल तर त्या लोकांना थोडं अॅडजेस्ट करण्यास सांगा. परंतु स्थिती फारच बिघडली असेल तर ती ठिक तेव्हाच होऊ शकते जेव्हा दोन्ही बाजूची मंडळी अॅडजेस्टमेंट करण्यास तयार असतील.


हेही वाचा- Unconditional Love तुमचं नातं अटी शर्थीवर टिकलयं की प्रेमावर ? असं ओळखा

- Advertisment -

Manini