Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship 'हे' संकेत सांगतात पार्टनरचे तुमच्यावर प्रेम नाही

‘हे’ संकेत सांगतात पार्टनरचे तुमच्यावर प्रेम नाही

Subscribe

कोणतेही नाते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांची साथ असणे फार गरजेचे असते. काही वेळेस असे मानले जाते की, रिलेशनशिपमध्ये एकच पार्टनर रिलेशनशिप टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र दुसरा पार्टनर त्यासाठी काही कष्ट घेत नाही. अशातच पुढील काही संकेत सांगतात की, पार्टनरचे तुमच्यावर प्रेम नाही.

प्राथमिकता न देणे
जर तुमचा पार्टनर जर तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तो तुम्हाला प्राथमिकता देईल. मात्र असे नसेल तर तुमचे नाते फारकाळ टिकू शकत नाही असे संकेत आहेत.

- Advertisement -

वेळ न देणे
जर पार्टनर तुमच्यावर प्रेम करत नसेल तर तो तुम्हाला वेळ देण्यासाठी काही ना काही बहाणे किंवा कारणे देईल. तुमच्यापासून दूर राहण्याचा सतत प्रयत्न करेल.

भविष्य पाहणे
जर पार्टनर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो आयुष्यभराची साथ कशी देता येईल याचा विचार करेल. त्याचसोबत भविष्याबद्दल प्लॅनिंग करेल. पण असे काही तो करत नसेल तर समजून जा पार्टनर तुमच्यावर प्रेम करण्यास कुठेतरी कमी पडतोय.

- Advertisement -

खोटं बोलणे
पार्टनर खोटं बोलत असेल तर प्रत्येक गोष्टीवरून बहाणे सांगेल. हे खरंतर विश्वासून पार्टनरचे लक्षण नव्हे. अशातच रिलेशनशिपमध्ये दिखावा काही महत्त्वाचा नाही तर प्रेम महत्त्वाचे असते.

एकमेकांच्या चुका काढणे
जर पार्टनर दिवसभर तुमच्या चुका काढत असेल तर हे तुमच्या नात्यात फूट पडण्याचे संकेत आहेत.

कारणाशिवाय भांडणे
जर तुमचा पार्टनर कोणत्याही गोष्टीवरुन तुमच्याशी सतत भांडत असेल तर नाते बिघडू शकते. लहान-लहान गोष्टीवरुन तुम्हाला बोलणे, टोमणे मारणे यामुळे ही अधिक वाद वाढला जाऊ शकतो.


हेही वाचा- पार्टनरचा तुमच्यातला इंटरेस्ट कमी झालाय, कसे ओळखाल

- Advertisment -

Manini