Monday, January 20, 2025
HomeमानिनीRelationship Tips : पार्टनरसोबत सतत भांडण होते ? असे सोडवा

Relationship Tips : पार्टनरसोबत सतत भांडण होते ? असे सोडवा

Subscribe

नात्यात भांडण होणे ही सामान्य बाब आहे. प्रत्येक नात्यात छोटी मोठी भांडणे होत असतात. पण, पार्टनरसोबत सतत भांडणं होत असतील तर हे कोणत्याही नात्यासाठी योग्य लक्षण नाही. अशाने नात्यात दुरावा यायला वेळ लागत नाही. त्यामुळे पार्टनरसोबत झालेली भांडणे कशी सोडवायची यावरील सोप्या टिप्स पाहूयात ,

सर्वात पहिले तर एकमेकांना दोष देणं थांबवायला हवे. यानंतर एकमेकांची बाजू समजून घ्यायला हवी. दोघांचे म्हणणे एकमेकांनी शांतपणे ऐकून घ्यायला हवे.

दोघांनी एकमेकांचे शांतपणे ऐकल्याने वाद वाढत नाही.

दोघांनी एकमेकांना आपली बाजु समजून सांगायला हव्यात. याने भांडण मिटण्यास मदत होईल. पण, बाजु समजून सांगताना तुमचे म्हणणे लादू नका.

खरं तर भांडण झाल्यावर प्रेम वाढते असे म्हटले जाते. भांडण झाल्यावर तुमची चूक झाली असेल मान्य करा.

भांडणानंतर पार्टनरसोबत डेटवर जाऊ शकता. तिच्या किंवा त्याच्या आवडीच्या हॅाटेलमध्ये जाऊ शकता. याने भांडण तर मिटेलच शिवाय नातेही सुधारेल.

भांडण झाले असेल तर अबोला न धरता कमीपणा घेत एकमेकांशी बोला. याने बरेच गैरसमज दूर होतील आणि भांडण मिटेल.

 

 

 

 

हेही पाहा :


Edited By – Chaitali Shinde

Manini