Thursday, April 18, 2024
घरमानिनीRelationshipपार्टनर बरोबर बोलणं कमी पण वाद जास्त, तर हे आहेत break up चे संकेत

पार्टनर बरोबर बोलणं कमी पण वाद जास्त, तर हे आहेत break up चे संकेत

Subscribe

कोणतेही नाते परफेक्ट नसते. कपल्समध्ये वाद -भांडण ही नेहमीच होत राहतात. पण काही गोष्टी अशा असातात त्या रिलेशनशिपमध्ये कधीच आणू नयेत. वारंवार त्या कारणामुळे तुमच्या नात्यात वाद होऊ शकतात. अशातच तुमचे नाते मोडले जाऊ शकते.

-सतत टोमणे मारणे
चुका तर आपल्या सर्वांकडून होत राहतात. पण नेहमीच चुकांवर बोलत राहिले तर तुमच्या नात्यात वाद वाढू शकतात. त्याचसोबत आपल्या पार्टनरच्या भुतकाळातील चुका पुन्हा उकरुन त्यावर सतत टोमणे मारल्याने ही तुमचे नाते मोडू शकते.

- Advertisement -

-एकच चुक पुन्हा पुन्हा करणे
असे म्हटले जाते की सहनशक्तीसाठी सुद्धा एक मर्यादा असते. अशातच तुम्ही तुमची एखादी चुक सतत करत रहाल तर पार्टनरचा ताबा एकदिवस सुटतोच. वारंवार माफी मागण्याच्या तुमच्या या सवयीमुळे तो वैतागू शकतो.

- Advertisement -

-दोघांमधील संवाद कमी होणे
एकमेकांच्या मनातील भावना खुलेपणाने सांगितल्या पाहिजेत. बोलून काही गोष्टींचा गुंता सुटला जातो. अशातच तुमच्या दोघांमधील संवाद कमी झाला असेल तर संशयाची भावना तुमच्या निर्माण होऊ शकते आणि यामुळे ही तुमच्यात वाद वाढू शकतात.

-एक्सबद्दल बोलत राहणे
भुतकाळात झालेल्या गोष्टींना मागे सोडून पुढे जायला पाहिजे. अशातच तुम्ही एक्स बद्दल सतत पार्टनरशी बोलत असाल तर तुमच्यात त्याच्यावरुन वाद सुरु होतील. तुमच्यात गैरसमज ही निर्माण होऊ शकतात ह लक्षात घ्या.


हेही वाचा- Relationship: ‘या’ संकेतांवरून कळेल तुम्ही Toxic रिलेशनशिपमध्ये आहात

- Advertisment -

Manini