Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipRelationship: 'या' संकेतांवरून कळेल तुम्ही Toxic रिलेशनशिपमध्ये आहात

Relationship: ‘या’ संकेतांवरून कळेल तुम्ही Toxic रिलेशनशिपमध्ये आहात

Subscribe

नात्यात प्रेम, भांडण या गोष्टी होतच राहतात. कधी कधी असे होते की, पार्टनर असे काही बोलतो ज्यामुळे आपल्याला अधिकच दु:ख होते. पण काही रिलेशनशिप मध्ये असे होते की, पार्टनर वारंवार दुसऱ्या पार्टनरच्या भावना समजून घेत नाही किंवा त्याला पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा काढता पाय घेतो. अशावेळी दुसऱ्या पार्टनरला आपण असुरक्षित असल्याचे कधीकधी वाटू लागते. प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दिसते. ज्या व्यक्तीला असा अनुभव येतो त्यांनी काही संकेतांवर लक्ष देणे फार गरजेचे आहे. जेणेकरुन एखाद्या मोठ्या समस्येपासून दूर राहता येईल.

-पार्टनरचा पाठिंबा नसणे
हेल्दी रिलेशनशिपमध्ये सर्व काही गोष्टी अगदी सुरळीत सुरु असतात. एकमेकांना समजून घेतले जाते. परंतु जेव्हा पार्टनर तुमच्या बोलण्याला, करण्याला फारसे महत्व देत नाही तेव्हा गोष्टी बिघडू लागतात. नकारात्मकतेची भावना अशावेळी वाढू लागते. पार्टनरची साथ मिळत नसल्याने अधिक चिडचिडेपणा येतो. दोघांना एकमेकांचा आनंद कशा आहे याचाच विचार केला जातो. यामध्ये स्वार्थी भावना ही निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

-टॉक्सिक कम्युनिकेशन
एकमेकांना सन्मान देणे किंवा माफ करण्याऐवजी बहुतांशवेळा पार्टनरच्या चुका दाखवणे यालाच टॉक्सिक कम्युनिकेशन असे म्हटले जाते. यामुळे नात्यात फूट पडू शकते.

-पार्टनरचा द्वेष करणे
रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुरुवातीला सर्वकाही छान वाटते. परंतु नाते जसे जसे पुढे जाते तेव्हा काही खटके उडाल्यानंतर पार्टनरचा राग येऊ लागतो. असे होणे सामान्य आहे. परंतु वेळोवेळी पार्टनरचा द्वेष करणे किंवा त्याच्यावर जळणे हे काही योग्य नाही. यामुळे नात्यातील विश्वासाला तडा जाऊ शकतो.

- Advertisement -

-वागण्यावर कंट्रोल करणे
जेव्हा नात्यात पार्टनर तुमच्यावर कंट्रोल करु पाहत असेल तर समजून जा तुम्ही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी पार्टनर तुमच्या लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेवून असतो. यामुळे तुम्हाला एका मर्यादेनंतर पार्टनरची खुप चिड येते आणि तुम्ही नाते संपण्याचा विचार करता.

-सतत पार्टनरवर नाराज राहणे
पार्टनरवर नाराज होणे स्वाभाविकच आहे. परंतु प्रत्येक वेळी नाराज राहणे म्हणजे तुमच्या नात्यात काहीतरी बिनसलेय हे समजून जा. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये पार्टनरची प्रत्येक लहान-लहान गोष्ट सुद्धा तुम्हाला नाराज करु शकते. काही वेळेस पार्टनर तुमच्याशी जास्त बोलत नसेल तेव्हा सुद्धा तो नाराज असू शकतो.

-विश्वासघात करणे
पार्टनरपासून काही गोष्टी लपणे किंवा खोटं बोलणं सुद्धा टॉक्सिक रिलेशनशिपचे संकेत आहेत. पार्टनरचा विश्वासघात केल्यास नात्यावर त्याचा परिणाम होतो.

-सतत तणावाखाली राहणे
पार्टनरमुळे शारीरिक आणि मानसिकरित्या सतत तणावाखाली राहणे सुद्धा संकेत देतात की, तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात. यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी नकारात्मकताच दिसते. काही करण्याची इच्छा होत नाही. थकवा जाणवतो. नाते कधी टॉक्सिक होते याचा अंदाज लावणे सुद्धा मुश्किल होते.

वरील काही संकेतांच्या माध्यमातून तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तर नाहीत ना हे ओळखू शकता.


हेही वाचा- Relationship : पार्टनरसोबत संबंध बिघडू लागल्यास असे सावरा नाते

- Advertisment -

Manini