Saturday, April 20, 2024
घरमानिनीनातेसंबंधात पार्टनरला स्पेस देणं महत्वाचं आहे का?

नातेसंबंधात पार्टनरला स्पेस देणं महत्वाचं आहे का?

Subscribe

प्रेमसंबंधात किंवा पती पत्नीमध्ये तणाव निर्माण झाला तर दोघा पार्टनरला एकमेकांपासून स्पेस हवी असती. यामुळे नातेसंबंधात  एकमेकांना अशी स्पेस देणं खरचं इतक महत्वाचं आहे का? काय कारण आहे या स्पेसमागचं हे जाणून घ्यायला हवं.

आजकाल नातेसबंधात स्पेस हा शब्द सरासपणे वापरला जातोय. यात कधी मुलांना पालकांकडून स्पेस हवी असती तर कधी प्रेमसंबंधात किंवा पती पत्नीमध्ये तणाव निर्माण झाला तर दोघा पार्टनरला एकमेकांपासून स्पेस हवी असती. यामुळे नातेसंबंधात  एकमेकांना अशी स्पेस देणं खरचं इतक महत्वाचं आहे का? काय कारण आहे या स्पेसमागचं हे जाणून घ्यायला हवं.

- Advertisement -

कुठलंही नातं मग ते पती पत्नीचे असो आई -वडीलांचे मुलांबरोबर असो कि प्रेमसबंधांच किंवा मैत्रीचं. प्रत्येक नात्यांमध्ये कधी ना कधी विरोधी विचारांमुळे तर कधी परिस्थितीमुळे तणाव निर्माण होतो. यातील काही तणावांचे निरासन चर्चेतून केले जाते. काही तणाव वेळेनुसार निवळत जातो. पण काही वाद मात्र दिर्घकाळ सुरूच असतात. त्यातून तोडगा निघतच नाही. यामुळे साहजिकच नातेसंबंध अधिक ताणले जातात. दोघा पार्टनरमध्ये दुरावा येतो. अशावेळी एकमेकांना स्पेस देण्याचा निर्णय घेतला जातो. स्पेस म्हणजे अंतर.

- Advertisement -

मग यात कधी काही दिवसांसाठी दोघं वेगवेगळे राहतात. काहीजण बोलण बंद करतात. तर काहीजण एकाच छताखाली राहून अलिप्त होऊन राहतात. यामागचा मूळ उद्देश असतो आत्मचिंतन. राग शांत करण्याचा प्रयत्न.

नाते बिघडण्यात नेमके काय चुकतयं? त्यातून मार्ग कसा काढता येईल. त्यावर तोडगा काही आहे का? आपण चुकतोय की पार्टनर प्रत्येकवेळी आपल्याला गृहीत धरतोय की आपण आपल्या पार्टनरशिवाय राहू शकतोय का ? यासर्वांची चाचपणी म्हणजे स्पेस. खरं तर स्पेस देणं एका अर्थी चांगलचं . कारण याच स्पेसमुळे पार्टनरबरोबरच्या नात्यावर विचार करण्याची वेळ मिळते. जर जोडप्यांमध्ये एकाच विषयावरून सतत वाद होत असेल आणि त्यावर तोडगाच काढण्याची दोघांची इच्छा नसेल तर स्पेस देऊन हे नातं संपवण दोघांना सोपं असतं. पण जर यात एक पार्टनर फक्त आपलंच खरं करण्यासाठी दुसऱ्याला स्पेस देण्याच्या नावाखाली दूर करून त्याचा मानसिक छळ करत असेल तर मात्र ही स्पेस डोकेदुखी ठरू शकते.

यामुळे स्पेस देताना आणि घेताना दोघांनी स्पेस का घेत आहोत हे स्पष्ट करावं. कारण अनेकवेळा वाद झाल्यानंतर स्पेस घेतल्यानंतर दोघांना एकमेकांचे आयुष्यातील महत्वही समजते. यामुळे नाते पुन्हा एकदा घट्ट होते. पण त्याचा अतिरेक झाल्यास नातेसंबंधातील दुरावा अधिकच वाढतो. यामुळे स्पेस घ्यावी पण ती प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा गुंता वाढवण्यासाठी नाही हे दोघांना समजायला हवे.

 

 

- Advertisment -

Manini