लहानपणापासून ज्यांनी आपला सांभाळ केला, आपल्याला काय हवं, नको ते बघितलं असे आईवडील जेव्हा म्हातारे होऊ लागतात तेव्हा एक जबाबदार मुलगा किंवा मुलगी म्हणून त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की जेव्हा पालक वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पोहोचतात तेव्हा त्यांच्या आदरात कोणतीही घट होऊ देऊ नये. कारण म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं. यासाठीच आपल्याला त्यांचे पालक होण्याची गरज असते.
कारण ते अशा वयात असतात जेव्हा ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर त्यांना खूप वाईट वाटेल. म्हणून, त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर, कधीही अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील. कारण तुमच्या तोंडून निघणारे शब्द त्यांच्या हृदयाला वेदना देऊ शकतात.
1. त्यांना म्हातारे वाटू देऊ नका.
जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांना तुम्ही म्हातारे होत आहात याची जाणीव करून देता तेव्हा ती त्यांच्यासाठी खूप गंभीर बाब बनते. खरं तर, त्यांच्यासमोर तुम्ही अजूनही लहान आहात असे त्यांना नेहमी जाणवू द्या. तुम्हाला त्यांची गरज आहे. जर तुम्ही त्यांना हे सांगायला सुरुवात केली की ते आता म्हातारे झाले आहेत. आता ते तुमच्यावर अवलंबून आहेत, तर याचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांना असहाय व हतबल वाटू शकते.
2. तुमच्या मित्रांसमोर त्यांच्याशी प्रेमाने बोला.
तुमच्या घराच्या चार भिंतींमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वागता हे कोणालाही माहिती नसते. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा तुमच्या मित्रांसमोर असता तेव्हा तुम्ही तुमच्या पालकांसोबत कसे वागता? हे खूप महत्वाचे आहे. अनेकदा असे दिसून येते की एखादा मित्र घरी आला असेल आणि वृद्ध पालक घरात असतील व मुलांचा पालकांबद्दलचा सूर कधीकधी कठोर होतो. यामुळे पालकांच्या मनाला वेदना होऊ शकतात. त्यामुळे कधीही आईवडिलांशी बोलत असताना त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या.
3. तुम्ही आमच्यासाठी काय केले आहे, असा सूर कधीही नसावा.
हल्ली अनेकदा असे दिसून आले आहे की आजच्या पिढीतील मुले त्यांच्या पालकांना सर्रास विचारतात की, तुम्ही आमच्यासाठी काय केले आहे? कायम लक्षात ठेवा की पालकांना कधीही अशा गोष्टी विचारू नयेत. जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा त्यांनी त्यांच्यापरीने व त्यांच्या क्षमतेने तुमच्यासाठी खूप काही केले आहे. तुमच्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंत आणि नंतर लग्नापर्यंत, ते नेहमीच मुलांच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले असतात. तरीसुद्धा, जेव्हा त्यांचीच मुले त्यांना अशी उलट बोलू लागतात तेव्हा त्यांना अशा मुलांना स्वत:चे मूल म्हणवून घ्यायची लाज वाटू लागते.
हेही वाचा : Beauty Tips : ड्राय स्किनसाठी हे होममेड स्क्रब बेस्ट
Edited By – Tanvi Gundaye