लग्न झाले की आयुष्यभरासाठी नवरा बायकोमधील प्रेम, जिव्हाळा कायम तसाच राहील असे नाही. कालांतराने वाद होत जातात. नात्यातील ओलावा टिकून राहण्यासाठी छोटी मोठी भांडणे वाद होणे देखील आवश्यक आहे. पण, कधी कधी छोटे मोठे वाद इतकी ताणले जातात की, दोघांच्याही आयुष्यावर याचा गंभीर परिणाम व्हायला सुरुवात होते. परिणामी, दोघांच्याही आयुष्यातील आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे नवरा बायकोचे नाते टिकण्यासाठी दोघांमध्ये वाद कशावरून होत आहेत याची कारणे शोधणे गरजेचे असते. जाणून घेऊयात, यामागची बेसिक कारणे
खोटे बोलणे –
अनेकदा नातेसंबंध बिघडण्यासाठी खोटे बोलणे हे मुख्य कारण ठरते. जर तुम्ही पार्टनरशी सतत खोटे बोलत असाल तर तुमच्यात वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला जर का अशी खोटे बोलायची सवय असेल तर त्वरित बदलायला हवी.
वेळ न देणे –
कोणतेही नाते प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांवर टिकून असते. त्यामुळे पती पत्नी दोघेही नोकरी करणारे असले तरी त्यांनी एकमेकांना वेळ नक्कीच द्यायला हवा. तसे जर तुम्ही करत नसाल तर तुमच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि कालांतराने वाद होऊ शकतात.
संशय –
तुम्ही जर तुमच्या पार्टनरवर सतत संशय घेत असाल तर अशाने तुमच्या नात्यावर याचा परिणाम होतो. याने तुमच्यात एक प्रकारचे अंतर निर्माण होते. हळूहळू ह्या अंतराचे वादात रूपांतर होऊ लागते.
समजून न घेणे –
पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे आणखी एक कारण म्हणजे एकमेकांना समजून न घेणे.
आर्थिक परिस्थिती –
वैवाहिक आयुष्यात कटुता येण्याचे कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर अशाने दोघांमध्ये वाद होऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवे.
आदर न करणे –
जर तुम्ही एकमेकांचा आदर करत नसाल तर हे देखील पतिपत्नीमधील वादाचे एक कारण ठरू शकते. त्यामुळे नाते टिकण्यासाठी दोघांनीही एकमेकांचा आदर करणे आवश्यक आहे.
हेही पहा : प्रेम की वासना? कसं ओळखाल I Relationship Tips
Edited By – Chaitali Shinde