Sunday, October 1, 2023
घर मानिनी Relationship Relationship Tips: पार्टनवर वारंवार संशय घेत असेल तर काय करावे

Relationship Tips: पार्टनवर वारंवार संशय घेत असेल तर काय करावे

Subscribe

प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये विश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण विश्वासच तुमच्या नात्याचा महत्वाचा धागा असल्याचे मानले जाते. पार्टनवरील विश्वास कमी होऊ लागला किंवा संशय व्यक्त केला जाऊ लागला की, नात्यात फूट पडण्यास सुरुवात होते. अशातच गरजेचे आहे की, पार्टनरच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरुन पार्टनर एकमेकांना समजून घेत आपले नाते दीर्घकाळ कायम ठेवण्याचा विचार करेल. (Relationship Tips)

नात्यात अविश्वास असेल तर दोघांमध्ये वाद होऊ शकतात. कालांतराने तुमचे नाते मोडले जाऊ शकते. अशातच तु्म्ही सुद्धा वारंवार पार्टनरवर संशय व्यक्त करत असाल तर यावेळी विश्वास कसा निर्माण करायचा या बद्दलच्या काही खास टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

- Advertisement -

संशयामागील कारण जाणून घ्या
जर पार्टनर तुमच्यावर वारंवार संशय घेत असेल तर यामागील नेमकं कारण काय हे समजून घ्या. पार्टनरने संशय करण्यामागील कारण हे तुम्ही तर नाहीत ना किंवा तुम्ही केलेली एखादी चूक नाही ना हे सुद्धा पहा. पार्टनरसोबत बोलून तुमच्यामधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. अशी चूक करण्यापासून दूर रहा ज्यामुळे संशय वाढला जाईल.

रिलेशनशिपचे महत्व समजवा
पार्टनरला तुम्ही त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये का आहात हे समजावून सांगा. तसेच रिलेशनशिपचे महत्व काय हे सुद्धा सांगा. एकमेकांबद्दल तुम्ही काय विचार करता, तुमच्या भावना एकमेकांशी शेअर करा. यामुळे तुमच्या दोघांत स्पष्टता अधिक राहिलच पण प्रेम ही वाढेल.

- Advertisement -


पार्टनरचा आदर करा
पार्टनरचा आदर करता. जेव्हा तुम्ही पार्टरनरचा आदर कराल तेव्हाच तो सुद्धा तुम्हाला सन्मान देईल. त्यांची परवाह केली तर तो तुमच्यावर विश्वास ठेवू लागले. या व्यतिरिक्त तुमच्या भावना त्याला अधिक स्पष्टतेने कळतील. ज्या नात्यात एकमेकांना सन्मान अधिक दिला जातो तेच नाते दीर्घकाळ टिकते. जेथे तुमचा अपमान केला जातो ते नाते कधीच टिकू शकत नाही.(Relationship Tips)

पार्टनरच्या निर्णयाचे स्वागत करा
प्रेम आणि रिलेशनशिप मध्ये विश्वास कायम टिकवून ठेवण्यासाठी पार्टनरला नेहमीच दाखवून द्या की, त्याच्या शिवाय तुम्ही जगू शकत नाहीत. पार्टनरने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करा. जर तुम्हाला त्याचा निर्णय पटत नसेल तर त्याला तो का पटत नाहीय याचे ही स्पष्टीकरण द्या. याचा अर्थ असा नव्हे की, प्रत्येक निर्णय हा त्याने तुमच्या मर्जीनुसारच घेतला पाहिजे.

एकटेपण वाटू देऊ नका
जेव्हा पार्टनरची खुप काळजी घेतो तेव्हा त्याला ही सुरक्षित असल्यासारखे वाटते. जेव्हा तुम्ही पार्टनरच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल तेव्हा त्याला कधीच एकटे वाटणार नाही. पण याउलट तुम्ही गोष्टी करू लागलात तर तु्मच्याशी नाते मोडण्याचा विचार पार्टनर जरुर करु शकतो हे लक्षात ठेवा.


हेही वाचा- पार्टनर बरोबर बोलणं कमी पण वाद जास्त, तर हे आहेत break up चे संकेत

- Advertisment -

Manini