Saturday, June 10, 2023
घर मानिनी Relationship नातं मजबूत करण्यासाठी थोड खोट बोलावं लागेल

नातं मजबूत करण्यासाठी थोड खोट बोलावं लागेल

Subscribe

आपल्याला घरातील मोठं माणसं कोणाशी ही खोटं बोलू नये असे सांगतात. खासकरुन पार्टनरशी खोटं बोलू नये. परंतु हे नाते विश्वासावर टिकलेले असते. खोटं बोलून तुम्ही काही वर्ष एकमेकांसोबत राहू शकता. पण आयुष्यभर नाही. परंतु काही वेळेस असे ही दिसून येते की, अधिकच सत्य बोलत राहिलो तर नाते तुटते सुद्धा. पण रिलेशनशिपमध्ये कधी कधी खोटं बोलतती तर त्यात काही चुकीचे नाही. परंतु तुम्ही एक खोटं लपवण्यासाठी पुढील गोष्टींसाठी खोटं बोलत असाल तर असे करण्यापासून दूरच रहा.

गिफ्टची तारीफ करा

- Advertisement -


जर पार्टरने तुम्हाला एखादे गिफ्ट दिलेय तर त्याची तारीफ करा. असे असू शकते की, तुम्हाला ते गिफ्ट आवडलेले नाही. पण पार्टनरच्या भावनांचा मान ठेवण्यासाठी तरी खोटं बोलत ते आवडल्याचे सांगा.

प्रोत्साहित करा

- Advertisement -


जर तुम्ही नात्यात सर्वकाही गोष्टी उत्तम मॅनेज करत असाल तर पार्टनरला प्रोत्साहन देणे सुद्धा तुम्हाला जमेल. जर पार्टनर कामामुळे काही गोष्टी उत्तम पद्धतीने करत नसेल तर त्याची कधीतरी तारीफ करा. असे केल्याने समोरच्या व्यक्तीला बरे वाटेल.

फूड्सची तारीफ करा


जर पार्टनरने तुमच्यासाठी मनापासून काहीतरी बनवले आहे तर त्यांच्या मेहनतीकडे लक्ष द्या. असे असू शकते फूडमध्ये काहीतरी कमी जास्त असेल. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत पार्टनरची तारीफ जरुर करा.

लूकची तारीफ करा


जर तुमच्या पार्टनरने एखादा नवा लूक केला तर त्याची जरुर आधी तारीफ करा. भले तुम्हाला तो पसंद आला नसेल तर थोड्यावेळाने तुम्ही त्याबद्दल पार्टनरला चांगल्या शब्दांत सांगा.


हेही वाचा- लग्नाआधी ‘या’ 4 गोष्टी नक्की जाणून घ्या, नाहीतर…

- Advertisment -

Manini