Sunday, October 1, 2023
घर मानिनी पार्टनर बिझी असतो, मग असा घालवा वेळ

पार्टनर बिझी असतो, मग असा घालवा वेळ

Subscribe

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये कपल्सला एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच तुमचा पार्टनर सुद्धा त्याच्या कामात सतत व्यस्त असेल तर तुम्ही नक्की त्या वेळात काय करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना उपस्थितीत होतो. या वेळेत तुम्ही नक्की काय केले पाहिजेत याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-एकमेकांशी बातचीत करा
जर तुमचा पार्टनर हा व्यस्त असेल तर त्याची तक्रार करण्याऐवजी प्रथम त्याला समजून घ्या. त्यानंतर जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा त्याला भेटा अथवा एकमेकांशी बातचीत करा. एकमेकांना जर तुम्ही समजून घेतले तरच तुमचे नाते दीर्घकाळ टिकू शकते.

- Advertisement -

-क्वालिटी टाइम
क्विलिटी टाइम घालवण्यासाठी हे गरजेचे नाही की, तुम्ही प्रत्येक वेळी बाहेर फिरायला गेलेच पाहिजे. तुमचा पार्टनर जर कामात व्यस्त असेल तर ज्या दिवशी त्याला सुट्टी असेल तेव्हा तुम्ही डेट प्लॅन करु शकता.

- Advertisement -

-पार्टनरला गिफ्ट द्या
रिलेशनशिपला खास बनवण्यासाठी वेळोवेळी काही ना काही तरी अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचा पार्टनर आनंदित राहील. अशातच तुम्ही कधीतरी पार्टनरला छानसं गिफ्ट द्या. गिफ्ट नेहमीच महागडं असावे असे नाही तुम्हाला जसे जमेल त्यानुसार पार्टनरला गिफ्ट द्या. यामुळे तुमच्या नात्यात गोडवा कायम टिकून राहील.

-पार्टीचा प्लॅन करा
जर तुम्हाला पार्टी करावी असे वाटत असेल तर प्रथम पार्टनरला त्या बद्दल विचारा. जर त्याला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत ही पार्टी करु शकता. त्यावेळी त्या पार्टीत तुम्ही पार्टनरला तो कामातून फ्री झाल्यानंतर येण्यासाठी जरुर सांगा.

-डिनर डेटसाठी जा
कधीतरी थोडावेळ पार्टनरशी काढून डिनर डेटचा प्लॅन करा. पार्टनरला याचे सरप्राइज सुद्धा तुम्ही देऊ शकता. यामुळे पार्टनर हा खुश होईलच पण त्याच्या कामातून थोडावेळ तुम्हाला दिल्याचा आनंद ही त्याच्या चेहऱ्यावर दिसून येईल.

-शेड्युल तयार करा
जर तु्म्हाला वाटत असेल तर पार्टनरने तु्म्हाला वेळ द्यावा पण तसे होत नसेल तर तुम्ही एक शेड्युल तयार करा. जेणेकरुन तुम्ही एकमेकांना कधी वेळ देऊ शकता हे तुम्हाला कळेल.

 


हेही वाचा- Long Distance रिलेशनशिप अशी बनवा मजबूत

- Advertisment -

Manini