Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipबाळ झाल्यानंतर नात्यात दुरावा आल्यास 'या' टीप्स येतील कामी

बाळ झाल्यानंतर नात्यात दुरावा आल्यास ‘या’ टीप्स येतील कामी

Subscribe

सर्वसामान्यपणे लग्नानंतर पहिले बाळ नवरा-बायकोमधील रिलेशनशिप अधिक मजबूत बनवण्यास मदत करते. परंतु काही वेळेस असे ही होते की, दुसरे बाळ झाल्यानंतर नवका-बायकोमध्ये दुरावा येऊ लागतो. अशातच रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी आणि नात्यात जवळीकता आणण्यासाठी तुम्ही पुढील रिलेशनशिप टीप्स जरुर तुमच्या कामी येतील. (Relationship tips for married couple)

पहिल्या बाळानंतर कपल्सला बेबीला सांभाळण्याचा अनुभव अधिक असतो. अशातच त्यांचे पूर्ण फोकस मुलावरच असतो. त्यामुळे पार्टनरसाठी टाइम मिळत नाही.

- Advertisement -

-एकत्रित वेळ घालवा
बाळ झाल्यानंतर कपल्सला एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या दरम्यान एकमेकांशी बोलणे हे फार कमी होते. अशातच नात्यात दूरावा येऊ लागतो. अशातच गरजेचे आहे की, काही वेळासाठी बाळाला घरातील मंडळींना सांभाळण्यासाठी द्यावे आणि पार्टनर सोबत वेळ घालवावा. जर घरात तुमच्या शिवाय कोणीही नसेल तर बाळ झोपल्यानंतर पार्टनरसाठी वेळ काढू शकता.

- Advertisement -

-झोपही गरजेची 
एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी पुरेशी झोप घेणे ही फार गरजेचे आहे. खरंतर रात्रीच्या वेळेस बाळ सतत उठत राहतो. याच कारणास्तव कपल्सची झोप डिस्टर्ब होते आणि झोप पूर्ण न झाल्याने दिवसभर चिडचिडेपणा निर्माण होतो. अशातच प्रयत्न करा की, काही वेळासाठी का होईना एकमेकांनी थोडा-थोडावेळ त्याला सांभाळावे.

-बेबी मूनचा प्लॅन करा
जर तुम्हाला शक्य असेल तर एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालण्यासाठी बेबी मूनचा प्लान करु शकता. अशातच पार्टनर आणि बेबीसह एका उत्तम ठिकाणी जाऊन एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. यामुळे तुमच्या दोघांना घरातील काम आणि अन्य लोकांपासून ब्रेक मिळेल. तुम्ही स्वत:साठी ही वेळ काढू शकता. (Relationship tips for married couple)

-स्वत: ची काळजी घ्या
काही लोक पार्टनर आणि बाळाला अधिक वेळ देत असल्याने स्वत:साठी वेळ काढत नाही. यामुळे चिडचिड होते. अशातच पार्टनरसोबत वेळ ही घालवचा येत नाही. यावर उपाय म्हणजे तुम्ही तुम्हाला आवडत असलेला छंद जोपासू शकता. ऐवढेच नव्हे तर नेहमीच आनंदीत राहण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- Twins Baby- जुळ्या बाळांना असते एक्स्ट्रा काळजीची गरज

- Advertisment -

Manini