Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipतुमच्या पार्टनरचं अफेयर्स सुरू आहे का? कसे ओळखाल

तुमच्या पार्टनरचं अफेयर्स सुरू आहे का? कसे ओळखाल

Subscribe

लग्नानंतर तुम्ही सिंगल राहत नाहीत. तुमच्यावर आणखी एका व्यक्तीची जबाबदारी पडते आणि त्याच व्यक्तीसोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवावे लागते. त्याच्यावर विश्वास ठेवून नाते पुढे घेऊन जायचे असते. परंतु नात्यात संशय निर्माण झाल्यास ते दीर्घकाळ टिकणे मुश्किल होते आणि नात्यामधील विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. (Partner extra affair)

गर्लफ्रेंन्ड-बॉयफ्रेंन्डमध्ये वाद होऊ लागले की, नाते मोडल्यानंतर दु:ख होऊ शकते. मात्र नवरा-बायकोमध्ये असे नाते मोडणे सहज शक्य नसते. लग्नानंतर बहुतांश महिला केवळ घर आणि मुलांना सांभाळण्यातच आपलं अर्ध आयुष्य घालवतात. यामुळेच नवऱ्याला संधी मिळते की, त्याला घराबाहेर कोणीही अडवू शकत नाही. त्याला मजा करण्यासाठी मोकळीक मिळते. अशातच काही वेळेस पुरुषांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु होऊ लागतात. याचे परिणाम मात्र भयंकर असू शकतात.अशातच आम्ही तुम्हाला अशा काही संकेतांवरुन सांगणार आहोत की, नवऱ्याच्या अफेअर बद्दल कसे शोधून काढाल.

- Advertisement -

आपली प्रत्येक गोष्ट सीक्रेट ठेवणे
पार्टनर हा असा एक व्यक्ती असतो जो तुमच्यासोबत सर्वच गोष्टी बिंधास्त शेअर करु शकतो. परंतु अफेअरमध्ये असलेला पार्टनर काही गोष्टी करताना विचार करतो. तो आपला फोन, लॅपटॉपचे पासवर्डसह घराबाहेर जाण्याची कारणं सुद्धा सीक्रेट ठेवतो. जेणेकरुन त्याची चोरी पकडली जाऊ नये.

- Advertisement -

इमोशनली दूर राहतो
लग्नाच्या नात्यात नवरा-बायको मधील इमोशन संपणे म्हणजे नात्यात फुट पडण्यासारखे आहे. अफेअर मधील व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत बातचीत करतात, एकत्रित क्वालिटी टाइम घालवण्यामागे फार कमी इंटरेस्टेड असतो. तो नेहमीच तुम्हाला कामात व्यस्त असल्याची कारणं देत राहिल.

अशातच तुम्ही विचार करा की, शेवटचे तुम्ही आपल्या नवऱ्यासोबत खुलेपणाने कधी बातचीत केली होती. यावेळी त्याने खरंच तुमचे मनं लावून ऐकले होते का हे सुद्धा पहा.(Partner extra affair)

दैनंदिन आयुष्यात बदल
जेव्हा एखादा व्यक्ती प्रेमाच्या नात्यात असतो. तेव्हा आपल्या आवडीनिवडी विसरुन दुसऱ्याच्या आवडीच्या गोष्टी करु लागतो. यामध्ये कपडे ते एक्सरसाइज, हेल्दी खाणं, घरातील काम करणे. परंतु नवरा तुमच्यासोबत अश्या काही गोष्टी करणे कमी करत असेल किंवा त्यामध्ये काही बदल दिसून येत असेल तर लगेच संशय घेऊ नका. त्याच्या या वागण्याकडे थोडेदिवस लक्ष द्या. जर ते खुप काळ करत राहिला तर समजून जा यामागे त्याला एखादी स्री काहीतरी असे करण्यामागे सांगत असेल. मात्र एखाद्या निष्कर्षावर लगेच पोहचणे चुकीचे आहे.

काहीही विचारले तरीही भडकणे
जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यापासून लपवून काही गोष्टी करतो तेव्हा त्याला पकडले जाण्याची भीती असते. त्याची चोरी पकडण्यासाठी तो नेहमीच बचाव करण्यासाठी काही ना काही कारणं देत राहिल. अथवा कधी तो खुप भडकेल सुद्धा. अशातच जेव्हा तुम्ही त्याला एका महिलेच्या नावाने काही प्रश्न विचाराल तेव्हा त्याची बोबडी वळते.

रोमान्स करण्यापासून दूर राहणे
एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर हे वैवाहिक आयुष्यातील रोमान्स प्रभावित करते. नेहमीच अफेअर मध्ये असलेले पार्टनर लॉन्ग-दर्म पार्टनर सोबत रोमान्स करण्यास कमी उत्सुक असतात. अशातच ते यापासून बचाव करण्यासाठी विविध पर्याय शोधू लागतात.


हेही वाचा- तुमच्या पार्टनरचं अफेयर्स सुरू आहे का? कसे ओळखाल

- Advertisment -

Manini