Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship श्रीमंत नवरा शोधण्याआधी 'या' गोष्टींचाही करा विचार

श्रीमंत नवरा शोधण्याआधी ‘या’ गोष्टींचाही करा विचार

Subscribe

सर्वच नाती ही विश्वासावर टिकून असतात हे जेवढं खरं आहे तेवढीच आता नात्याची परिभाषा बदलली गेलीयं. आता सुद्धा पार्टनर जेव्हा शोधला जातो तेव्हा तो किती पैसेवाला आहे हे आवर्जुन पाहिले जाते. पण अशा व्यक्तीशी लग्न करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. कारण तुमच्या नात्यात भावनांपेक्षा पैशांना अधिक महत्व दिले गेले तर नाते दीर्घकाळ टिकू शकणार नाही. त्यामुळे लग्न करण्यासाठी श्रीमंत नवरा शोधत असाल तर पुढील काही गोष्टींचा विचार जरुर करा. (Relationship tips)

बायको असाल तर प्राथमिकता मिळेल का?
जर तुम्ही श्रीमंत व्यक्तीशी लग्न करण्याचा विचार करत असाल तर हे स्विकार करा की, तुम्ही त्याची फर्स्ट प्रायरिटी नाही. कारण कोणताही श्रीमंत व्यक्ती हा एखाद्या सामान्य उत्पन्न असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक व्यस्त असतो. अशातच श्रीमंतर व्यक्ती त्याच्या कामांना फार अधिक महत्व देतो. यामुळे तुम्हाला भावी पार्टनरच्या या गोष्टींबद्दल समजून घेतले पाहिजे.

- Advertisement -

नात्यात प्रेमापेक्षा पैसा अधिक
प्रत्येक महिलेला वाटतं असते की, ती रागवली तर नवऱ्याने समजूत काढावी, रोमँन्टिक बोलावं. परंतु श्रीमंत नवरा भावना कमी व्यक्त करेल आणि तुमचा राग दूर करण्यासाठी एखादे महागडे गिफ्ट तुम्हाला आणून देईल. सुरुवातीला तुम्हाला या सर्व गोष्टी छान वाटतील. पण यामध्ये तुमच्या दोघांमधील प्रेम कुठेतरी हरवले जाईल.

सुख-सुविधा मिळतील पण एकटेपणाच काय?
श्रीमंत नवऱ्याशी लग्न केल्यानंतर तुम्हाला सर्व सुख-सुविधांचा अनुभव घेता येईल. पण नवऱ्यासोबत आरामदायी आयुष्याचा एकत्रित आनंद फार कमी वेळा घेता येईल. नवऱ्याच्या बिझी शेड्युलमुळे एकत्रित डिनरला जाणे, शॉपिंगला जाणे होणार नाही. कालांतराने तुम्हाला अशा काही गोष्टी करताना एकटेपण वाटेल.

- Advertisement -

असुरक्षित वाटतं राहिल
श्रीमंत व्यक्तीतकडे आयुष्यात खुप काही गोष्टी करण्यासारख्या असतात. कारण तो आपल्या घरातील मंडळींसोबत कमी आणि ऑफिसच्या लोकांसोबत अधिक वेळ घालवतो. अशातच तेथे महिलांसोबत तो अधिक बोलत असेल किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवत असेल तर तुमच्या मनात नवऱ्याबद्दल इनसिक्युरिटी निर्माण होऊ शकते.

स्वत: ची ओळख कमी होईल
श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर तुमची स्वत:ची ओळख कमी होऊ शकते. ही गोष्ट तुम्हाला घराबाहेर नव्हे तर नात्यात राहून सुद्धा कळू शकते. कधीकधी खुलेपणाने एखादे मतं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न कराल पण ते नवऱ्याला पटेलच असे नाही.


हेही वाचा- पार्टनर बरोबर बोलणं कमी पण वाद जास्त, तर हे आहेत break up चे संकेत

- Advertisment -

Manini