Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Relationship रिलेशनशिपमध्ये पार्टनरचे 'हे' वागणे करु नका सहन

रिलेशनशिपमध्ये पार्टनरचे ‘हे’ वागणे करु नका सहन

Subscribe

डेटिंगवेळी कपल्सला पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. त्यामुळेच काही वेळेस पार्टनरच्या चुका सुद्धा माफ केल्या जातात. भले तुम्ही कितीही प्रेमात असाल तर नात्यात एकमेकांचा सन्मान करता आलाच पाहिजे. नात्यात तुम्हाला सन्मानच दिला जात नसेल तर असे नाते दीर्घकाळ टिकवून काहीच फायदा नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना पार्टनरचे असे कोणते वागणे आहे जे कधीच सहन करु नये याच बद्दल सांगणार आहोत.

-हे पाहणे फार महत्वाचे आहे की, तुमचा पार्टर किती तुम्हाला भावनिक महत्व देतो. तुम्ही जेव्हा त्याच्यासोबत तुमच्या आयुष्यासंबंधित एखादी समस्या शेअर करता तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर वाईट वाटते. असे वाटते की. पार्टनर तुम्हाला फार महत्व देत नाहीयं. अशातच रिलेशनशिप जेवढे लवकर संपवता येईल तेवढे बरे.

- Advertisement -

-जर तुमचा पार्टनर तुम्हाला कंट्रोल करु पाहत असेल चर हे सुद्धा असे वागणे आहे जे तुम्ही कधीच सहन करु नका. तु्म्हाला कुठे जायचे आहे, कोणाला भेटायचे आहे, कसे कपडे घालायचे आहेत या सर्व गोष्टींवर त्याचे नियंत्रण नसले पाहिजे. साध्यासाध्या गोष्टींवरुन तो तु्म्हाला अडवत असेल तर पुढे जाऊन यामुळे मोठा वाद होऊ शकतो.

-तुमचा पार्टनर वारंवार तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर असे त्याचे वागणे फार चुकीचे आहे. समजून जा तुम्ही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात. प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींत सतत बोलून दाखवणे योग्य नाही. त्यामुळे पार्टनरचे असे सुद्धा वागणे कधीच सहन करु नका.


- Advertisement -

हेही वाचा- रागीट नवऱ्याला असं करा कंट्रोल

- Advertisment -

Manini