Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRelationshipRelationship Tips : नात्यातील दुरावा कमी करेल 80/20 नियम 

Relationship Tips : नात्यातील दुरावा कमी करेल 80/20 नियम 

Subscribe
80/20 चा नियम आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याची शिकवण देतो. या सिद्धांतानुसार, आपले 80 टक्के निकाल हे 20 टक्क्यांच्या प्रयत्नांतून आलेले असतात. याचा सरळ अर्थ असा की जर आपण आपल्या योग्य गोष्टींकडे नीट लक्ष दिले आणि त्यावर काम केले तर आपल्याला अवश्य यश मिळू शकते. कधीकधी लहान लहान प्रयत्नही आपल्याला मोठं यश मिळवून देतात. हीच गोष्ट नात्यांच्या बाबतीतही लागू होते. जर आपण 20 टक्के योग्य गोष्टींकडे लक्ष दिले तर नात्यात 80 टक्के सुधारणा होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात 80/20 नियमाबद्दल.

काय आहे 80/20 नियम ?

80/20 नियम आपल्याला शिकवतो की नात्यांमध्ये लहानसहान गोष्टींना नजरअंदाज करणंच चांगलं असतं. जर तुम्हाला नात्यात मजबूतपणा आणायचा असेल तर लहानलहान प्रयत्न करूनही तु्म्हाला मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जसे की गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देणे, जोडीदाराच्या आनंदाला प्राधान्य देणं, सकारात्मक गप्पा मारणं, एकमेकांसोबत वेळ घालवणं आणि चुका झाल्यावर एकदुसऱ्यांना माफ करणं यामुळे नातं अधिक घट्ट होतं. हे छोटे छोटे प्रयत्न तुमच्या नात्यात 80 टक्के सकारात्मक बदल निर्माण करतात.

जोडीदाराशी करा सकारात्मक संवाद :

कोणत्याही नात्यात संवाद साधण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते. प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलत असाल तेव्हा तो किंवा ती दुखावली जाईल , त्यांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट बोलू नका. जोडीदाराच्या चांगल्या कामाचे कौतुक करा. जोडीदाराशी केलेल्या 20 टक्के सकारात्मक गप्पांमुळे तुमच्या नात्यात 80 टक्के आनंद निर्माण होऊ शकतो.

आवश्यक गोष्टींकडे करा फोकस :

नात्यांमध्ये अनेकदा अडथळे तेव्हाच येतात जेव्हा आपण लहानसहान गोष्टींवर वेळ वाया घालवतो. 80/20 नियम असं सांगतो की आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं ज्या खरंच गरजेच्या आहेत. जसे की नात्यातील प्रेम, सन्मान आणि विश्वास यांना प्राधान्य द्यायला हवे.

जोडीदाराच्या आनंदाची काळजी घ्या :

कोणत्याही नात्यातील दोघांनीही हे जाणून घेण्याची गरज आहे की  तुमच्या जोडीदारासाठी सर्वात आवश्यक काय आहे? तुम्ही त्यांच्या लहान लहान आनंदाकडे लक्ष देऊन तुमचे नाते अधिक खुलवू शकता. 20 टक्के वेळ जोडीदाराच्या आनंदासाठी घालवला जात असेल तर 80 टक्के चांगला बदल तुमच्या नात्यात दिसून येऊ शकेल.

क्वालिटी टाईमसुद्धा आहे महत्त्वाचा :

प्रत्येक नात्याला वेळ देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवायला हवा. प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असाल तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष हे त्यांच्याकडेच असेल. अशावेळी  फोनसुद्धा मध्ये येऊ देऊ नका. तुमच्या 20 टक्के क्वालिटी टाईममुळे तुमच्या नात्यात 80 टक्के आनंद येऊ शकतो.

Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini