लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांसोबत एक नवा बंध तयार करतात आणि एकमेकांसोबत सुखदु:खं वाटून घेतात, एकमेकांना साथ देतात. लग्नाच्या बंधनात पतीपत्नीच्या नात्यात एक रोमँटिक नातं असणंदेखील गरजेचं असतं तेव्हाच लग्न टिकू शकतं. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एका अनोख्या प्रकारच्या लग्नाची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये वाढत चालली आहे. याला ‘फ्रेंडशिप मॅरेज’ म्हटलं जातं. हे पारंपरिक लग्नापेक्षा थोडं वेगळं आहे. जाणून घेऊयात नेमकं ‘फ्रेंडशिप मॅरेज’ काय आहे याविषयी.
‘फ्रेंडशिप मॅरेज’ म्हणजे काय ?
‘फ्रेंडशिप मॅरेज’मध्ये दोन व्यक्ती कायदेशीर रित्या एकमेकांशी विवाहबद्ध असतात. परंतु त्यांच्यामध्ये पारंपरिक लग्नाप्रमाणे रोमँटिक संबंध नसतात. ते एकमेकांसोबत मित्र असल्यासारखे वागतात व राहतात आणि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर एकत्र निर्णय घेतात. याप्रकारच्या लग्नामध्ये जोडपी आपलं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवतात. आणि एकमेकांना पुरेसं व्यक्तिस्वातंत्र्य देतात. थोडक्यात हे लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील भावनिक बंध नसून एक व्यावसायिक रुपातील करार असतो.
का वाढतोय ‘फ्रेंडशिप मॅरेज’चा ट्रेंड ?
सामाजिक दबाव :
जपानमध्ये लग्नाकडे एक सामाजिक अपेक्षा म्हणून पाहिलं जातं. अनेक तरुणांवर लग्न करण्यासाठी कुटुंब आणि समाजाकडून दबाव टाकण्यात येतो. परंतु ही तरुण मंडळी लग्नाच्या विचारांशी फार सहमत नसतात. फ्रेंडशिप मॅरेज त्यांना या दबावापासून मुक्ती देते आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करण्याची संधी देते.
एकटेपणा आणि एकांत :
मॉडर्न लाइफस्टाईलमध्ये काही लोक एकटे पडतात. त्यांना समजून घेणाऱ्या जोडीदाराची आवश्यकता असते. फ्रेंडशिप मॅरेजमध्ये त्यांना एक असा जोडीदार मिळतो ज्यांच्यासोबत जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर ते त्यांच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करू शकतात.
आर्थिक सक्षमता :
फ्रेंडशिप मॅरेजमुळे घराचा खर्च अर्धा अर्धा वाटून घेतला जातो. यामुळेच जोडप्यांमध्ये एक आर्थिक स्थैर्यता येते.
फ्रेंडशिप मॅरेजचे फायदे व नुकसान काय आहेत ?
स्वातंत्र्य : फ्रेंडशिप मॅरेजमध्ये जोडपी आपल्या मर्जीने जगू शकतात. आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करतात.
सुरक्षा : फ्रेंडशिप मॅरेजमुळे जोडप्यांना आर्थिक आणि भावनिक सुरक्षा मिळते. सोबतच फ्रेंडशिप मॅरेज एकमेकांवर दबाव न टाकता आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याची संधी आपल्याला देते.
भावनिक समस्या : फ्रेंडशिप मॅरेजमध्ये समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा कपलमधील एखाद्याच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल रोमँटिक भावना निर्माण होतात.
हेही वाचा : Uses Of Orange Peel : संत्र्याच्या सालीचा असा करा वापर
Edited By – Tanvi Gundaye