Gen Z च्या जगात दरवेळी आपल्याला नवीन काहीतरी पाहायला आणि ऐकायला मिळत असतं. नवीन शब्द, नवे ट्रेंडस आणि नवे अनुभव. आज आपण दोन अशा नव्या शब्दांबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला नेहमी सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. ते म्हणजे सॉफ्ट लाँच आणि हार्ड लाँच.
रिलेशनशिपशी जोडलेल्या काही मुद्द्यांवर बोलत असताना तुम्ही नक्कीच याविषयी ऐकलं असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? खरंतर अनेक लोकांना या दोन शब्दांविषयी काहीच माहिती नाही. आज या लेखातून आपण जाणून घेऊयात की या सॉफ्ट लाँच आणि हार्ड लाँच शब्दांचा वापर रिलेशनशिपमध्ये केव्हा आणि कशासाठी केला जातो याबद्दल.
सॉफ्ट लाँच म्हणजे काय ?
सॉफ्ट लाँच ही सोशल मिडीयावर रिलेशनशिपबद्दल घोषणा करण्याची अशी एक पद्धत आहे की ज्यामध्ये आपल्या पार्टनरसोबत एक फोटो किंवा व्हिडीओ शेअर करुन सांगितलं जातं. आपण एका नव्या व्यक्तीसोबत नात्याची सुरुवात केली आहे हे सोशल मिडीयावरुन सांगण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु या प्रकारात आपल्या जोडीदाराचा चेहरा किंवा त्याचे नाव जाहीर केले जात नाही. असं करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की प्रायव्हसीची चिंता किंवा नात्यामध्ये पूर्ण विश्वास नसणे.
हार्ड लाँच म्हणजे काय ?
नात्यामध्ये हार्ड लाँचचा अर्थ असा होतो की तुम्ही सगळ्यांनाच सांगू इच्छता की तुमचे कोणासोबत नाते आहे? तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मिडियावर टाकता, त्यांना प्रायव्हेट न ठेवता पब्लिक करता. आणि तुम्ही एकमेकांसोबतचे नाते जगजाहीर करता. या प्रकारामध्ये जोडपी सर्वांना सांगू इच्छित असतात की, “हा माझा जोडीदार आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे.”
दोघांमध्ये फरक काय ?
जर तुम्ही एखाद्या नव्या व्यक्तीला डेट करत असाल आणि तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीरदेखील असाल. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू इच्छिता की तुमचे कोणासोबत तरी नाते आहे पण जोडीदाराचे नाव किंवा चेहरा याबद्दल काही खुलासा करत नाही तर अशा प्रकारच्या नात्याला ‘सॉफ्ट लाँच’ म्हटलं जातं.
दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी लग्न करू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे फोटो, त्याचे नाव सोशल मिडियावर मोकळेपणाने शेअर करता यालाच हार्ड लाँच म्हटलं जातं. या प्रकारामध्ये तुम्ही दोघे मिळून एकत्र सोशल मिडीयावर पोस्ट टाकू शकता किंवा आपल्या तुमच्या जोडीदाराची भेट तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत करून देऊ शकता.
हेही वाचा : पगार पुरत नाहीये? जोडीदाराला वायफळ खर्च करण्याची सवय आहे? असा करा कंट्रोल
Edited By – Tanvi Gundaye