Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीReligious Tips : मोबाइलवर हे वॉलपेपर लावणे ठरू शकते अशुभ

Religious Tips : मोबाइलवर हे वॉलपेपर लावणे ठरू शकते अशुभ

Subscribe

वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. अशा परिस्थितीत, आपण जे काही वापरत आहात त्याच्याशी संबंधित वास्तू नियम देखील लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सध्याच्या घडीला सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी वस्तू म्हणजे मोबाइल. आज या लेखातून आपण जाणून घेऊयात मोबाइलशी संबंधित काही वास्तू नियम. मोबाइलशी संबंधित वास्तू नियमांपैकी सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे मोबाइल स्क्रीनवरील वॉलपेपर. खरं तर, जेव्हा आपण वॉलपेपर लावतो तेव्हा त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर किंवा आपल्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो, याचा विचारही आपण कधी करत नाही, जे अत्यंत चुकीचं आहे. मोबाइल स्क्रीनवरील वॉलपेपरचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत, स्क्रीनवर कोणत्या प्रकारचे वॉलपेपर लावणे टाळायला हवे हे पाहणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, मोबाइल स्क्रीनवर वापरल्या जाणाऱ्या वॉलपेपरशी संबंधित काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स पाहूयात.

मोबाइलवर धार्मिक स्थळाचे वॉलपेपर लावू नका :

आपण मोबाइल कसाही कुठेही वापरतो, मग तो घाणेरड्या हाताने किंवा स्वच्छ हातांनी. बरेच लोक तर टॉयलेट , बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जातात. अशा परिस्थितीत धार्मिक स्थळाचा फोटो लावणे योग्य ठरणार नाही कारण त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या देवी-देवतांचा अपमान होईल .

Religious Tips Applying this wallpaper on mobile can be inauspicious

मोबाइलवर इमोशन वॉलपेपर वापरू नका.

लोक अनेकदा त्यांच्या मोबाइलवर वेगवेगळ्या भावना असलेले वॉलपेपर ठेवतात. जसे की दुःख, द्वेष, राग, मत्सर किंवा लोभ दर्शवणारे वॉलपेपर. अशा परिस्थितीत, मोबाइलवर हे भावनांवर आधारित वॉलपेपर ठेवल्याने जीवनातील नकारात्मकता वाढते आणि निराशा निर्माण होते.

मोबाइलवर देवी-देवतांचे वॉलपेपर लावू नका.

लोक त्यांच्या मोबाइलवर देवाचा फोटो वॉलपेपर म्हणून वापरतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तूनुसार देवी-देवतांचे फोटो असलेले वॉलपेपर लावल्याने ग्रह दोष निर्माण होतात आणि नऊ ग्रह जीवनात अशुभ परिणाम निर्माण करू लागतात.

मोबाईलवर अशा रंगांचे वॉलपेपर वापरू नका.

काळा, निळा, जांभळा, तपकिरी इत्यादी गडद रंगांचे वॉलपेपर देखील मोबाइल स्क्रीनवर वॉलपेपर म्हणून वापरू नयेत. यामुळे जीवनातील यशात अडथळा येतो. नोकरी, करिअर, व्यवसायात प्रगती होत नाही.

हेही वाचा : Health Tips : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सोशल मीडियापासून राहा दूर


Edited By – Tanvi Gundaye

Manini