सध्या आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कठोर परिश्रम करूनही आपल्या करिअरमध्ये यश मिळवू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधीकधी नोकरी न मिळाल्यामुळे नैराश्यही येतं. अनेकदा हे नैराश्य इतकं टोकाचं असतं की काहीजण अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंतही येऊन पोहोचतात. तुम्हीही नोकरीच्या किंवा करिअरच्या समस्यांशी संघर्ष करत असाल तर या लेखातील उपाय तुम्ही करून पाहू शकता. असं म्हटलं जातं की या उपायांच्या मदतीने नोकरी मिळण्याची शक्यता असते आणि करिअरमध्ये खूप प्रगती होते. नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जाणून घेऊयात हे काही उपाय.
जर तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाणार असाल तर त्याआधी एका लिंबूमध्ये चार लवंगा चारही दिशांना पुरून ठेवा. यानंतर अगदी मनापासून ‘ओम श्री हनुमंते नमः’ या मंत्राचा जप करावा. हा जप लिहून नेहमी सोबत ठेवा.
असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने मुलाखतीत यश मिळते आणि यामुळे लवकरच नोकरी मिळण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला नोकरीत अडथळे येत असतील तर पक्ष्यांना अन्नदान करा, त्यांना दाणे खायला द्या. ही युक्ती केल्याने नोकरीतील अडथळे दूर होऊ शकतील.
जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल आणि ती मिळत नसेल तर मंगळवारी हनुमान मंदिरात जावे आणि भगवान हनुमानाची विधिवत पूजा करावी. हनुमान चालिसाचे पठण करावे. तुम्ही हनुमानाला बुंदीचे लाडूही अर्पण करू शकता. नोकरी मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करावी.हा उपाय केल्याने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात आणि लवकरच अपेक्षित नोकरी मिळते.
स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास सूर्याची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन तुमची समस्या दूर करू शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी. तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य अर्पण करावे. या दरम्यान “ओम आदित्य नमः” किंवा “ओम घ्रिण सूर्याय नमः” या मंत्रांचा जप करावा.असे मानले जाते की हा उपाय केल्याने परीक्षेत यश मिळते आणि नोकरीच्या संदर्भात शुभवार्ता मिळते. याशिवाय विशेष वस्तूंचे दान करणेही फलदायी ठरते.
हेही वाचा : Beauty Tips : केसांसाठी हे जेल उत्तम
Edited By – Tanvi Gundaye