धावपळीच्या आयुष्यात अनेकांना रात्री झोप न लागण्याची समस्या सर्रासपणे जाणवते. रात्री अपूर्ण झोप झाल्याने दिवसभर चिडचिड होते, अस्वस्थ वाटते. दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं नाही याशिवाय दिवसा झोपही येते. काहीवेळा टेन्शन, ताणताणवामुळे झोप पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही निद्रानाशेपासून सुटका होण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला निद्रानाशेवरील काही सोपे पण रामबाण उपाय सांगणार आहोत.
काळे मनुके आणि केशरामुळे येईल झोप
निद्रानाशेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काळे मनुके आणि केशरचे सेवन करायला हवे. काळे मनुके आणि केशराच्या सेवनाने शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. त्यामुळे काळे मनुके आणि केशरचे सेवन शांत झोप येण्यासाठी फायदेशीर मानले जाते. खरं तर, काळे मनुके आणि केशर मधील गुणधर्म तुम्हाला रात्री गाढ झोप लागण्यास उपयुक्त ठरतात. तसेच मूड सुधारण्यातही फायदेशीर मानले जातात.
काळे मनुके (Black raisins)
काळ्या मनुक्यात भरपूर अॅटी-ऑक्सिडंट, पॉलीफेनॉल, रेस्वेरट्रॉल आढळतात, जे झोपेचे चक्र सुधारते. सेवनाने शरीरातील मेलाटोनिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते. ज्यामुळे तुम्हाला रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते.
केशर (Saffron)
केशरमध्ये सफ्रानल संयुगे असतात, जे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढवतात. ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. परिणामी, ताणतणाव कमी झाल्याने गाढ झोप लागते.
कसे सेवन करावे –
- एक ग्लास पाणी घ्यावे.
- या पाण्यात 3 ते 5 काळे मनुके आणि 2 ते 3 केशराच्या काड्या भिजत ठेवा.
- 4 ते 5 तास पाणी तसेच असुद्या.
- तयार पाणी तुम्ही झोपण्याआधी प्या.
- पाण्यातील मनुके आणि केशराच्या काड्या खायला विसरू नका.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde