घरात स्वयंपाक करताना बऱ्याचवेळा हाताला चटका लागला जातो तर कधी इस्री करताना. अशावेळी स्किन जळली जाते. यावर आपण काही घरगुती उपाय करू शकतो. अशातच जाणून घेऊयात घरात कामं करताना भाजलं, चटका लागला तर पुढील उपाय करू शकता.
ब्लॅक टी
ब्लॅक टी मध्ये टॅनिक अॅसिड असते. जे जळलेल्या त्वचेवरील जळजळ दूर होण्यास मदत होते. यामुळे दुखणे ही कमी होते. त्वचेवर थंड, ओलसर टी-बॅग ठेवा आणि ती थोडावेळ तेथेच ठेवा.
मध
जळलेल्या ठिकाणी मधाचा वापर करू शकता. यामध्ये असलेले अँन्टी-बॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्वचेला कोणत्याही संक्रमणापासून बचाव करते.
दूध
दूधात प्रोटीन आणि फॅट असते त्यामुळे ज्या ठिकाणी जळले असेल तेथे जळजळ दूर करण्यास कामी येईल. जवळजवळ 15 मिनिटे जळालेला हिस्सा दूधात भिजवा.
मिंट टुथपेस्ट
जळालेला हिस्सा पाण्याखाली धरा. सुकल्यानंतर त्यावर पुदीनाच्या टुथपेस्टचा एक स्तर लावा. यामुळे आराम मिळेल.
हेही वाचा- थंड पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ आजार