Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyमेलेनिनच्या कमतरतेमुळे केस होतात पांढरे

मेलेनिनच्या कमतरतेमुळे केस होतात पांढरे

Subscribe

वाढत्या वयासह काही अन्य समस्यांच्या कारणास्तव आपले केस पांढरे होऊ लागतात. मेलेनिनच्या कमतरतेच्या कारणास्तव ही समस्या होते. मेलेनिनला नैसर्गिक रुपात वाढल्यास केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहता येऊ शकते. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, मेलेनिन मानवाच्या शरीरात त्वचा, केस आणि डोळ्यांच्या पिगमेंटेशनला नियंत्रित करते. आपल्या शरीरात तीन प्रकारचे मेलेनिन असतात. जसे की, युमेलेनिन, फोमेलेनिन आणि न्युरोमेलेनिन.

त्याचसोबत केसांचा रंग हा नेहमीच एकसारखा नसतो. तो आयुष्यभर बदलत राहतो. वाढत्या वयासह मेलेनिनचे प्रोडक्शन कमी होत जाते. वाढत्या वयासह जेनेटिक्स, सुर्याची युवी किरणे, व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता, तणाव, ऑटोइम्यून डिजीज, केमिकल प्रोडक्ट्सचा वापर सुद्धा मेलेनिनच्या प्रोडक्डशनला प्रभावित करते.

- Advertisement -

White Hair Causes: How to Stop White Hair Growth? - Healthwire

केसांमध्ये मेलेनिन वाढवण्याचे उपाय
-व्हिटॅमिनचे सेवन
केसांमधील मेलेनिन वाढवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी-12 चे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात संत्र, अननस, टरबूज सारख्या फळांचा समावेश केला पाहिजे. या व्यतिरिक्त गाजर, बीन्स, बटाटा खाऊ शकता. चिकन लिव्हर, मासे आणि अंडी यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असते.

- Advertisement -

-मिनिरल्स
व्हिटॅमिनप्रमाणे मिनिरल्स महत्त्वपूर्ण आहे. जर केस आधीपासूनच पांढरे झाले असतील तर लोह आणि कॉपरचे सेवन केले पाहिजे. हे दोन्ही मिनिरल्स केसांमध्ये मेलेनिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. यासाठी हिरव्या भाज्या, बदाम, शेंगदाणे, डार्क चॉकलेटचे सेवन करावे.

-अँन्टिऑक्सिडेंट्स
अँन्टिऑक्सिडेंट्स मुळे शरीरातील कोशिकांचे संरक्षण होण्यासह मुक्त कणांच्या प्रभावापासून बचाव होते. हे केसांमधील मेलेनिनचे प्रोडक्शन वाढवते. डार्क चॉकलेट, बीन्स, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, गाजर, भोपळा यांचा आहारात समावेश करावा.


हेही वाचा- घनदाट केसांसाठी फायदेशीर ठरेल छास

- Advertisment -

Manini