Thursday, March 27, 2025
HomeमानिनीBeauty Tips : या होममेड उपायांनी हटवा टॅनिंग

Beauty Tips : या होममेड उपायांनी हटवा टॅनिंग

Subscribe

उन्हाळा सुरु झालेला असून या दिवसात उष्णता जास्त असल्यामुळे आपली त्वचा सहजपणे टॅन होते . बऱ्याचदा सनक्रीम लावून सुद्धा आपली त्वचा लगेच टॅन होते. हे टॅन दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करताे. बऱ्याचदा काही केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करतो. परंतु या प्रॉडक्ट्समुळे आपली स्किन अजून खराब होते. त्यामुळे आज आपण काही बेस्ट उपाय जाणून घेऊयात.

लिंबूचा रस आणि मध

लिंबूच्या रसात ब्लीचिंग इफ़ेक्टस असतात. जे चेहऱ्यावरील टॅन दूर करायला मदत करते. आता ताजा लिंबूचा रस घ्या त्यामध्ये मध मिसळा नंतर तुमच्या चेहऱ्यावर लावा. आता ३० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही लिंबाच्या रसात थोडी साखर देखील मिक्स करू शकता. हे एक्सफोलिएटर म्हणून काम करेल. ते त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने चोळा. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील.

दही आणि टोमॅटो

टोमॅटोमध्ये एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जे त्वचा चमकदार आणि चांगली बनवायला मदत करतात. दहीमध्ये लैक्टिक एसिड असते ज्यामुळे त्वचा मुलायम होते. त्यात १-२ चमचे ताजे दही मिसळा.ही पेस्ट तुमच्या टॅनवर लावा आणि २० मिनिटांनी धुवा.

काकडीचा रस

टॅनिंग स्किनसाठी काकडी खूप उत्तम आहे. उन्हाने खराब झालेल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. काकडीमध्ये एक थंडावा असतो आणि तो टॅनिंगपासून मुक्त होण्यास देखील मदत करतो. सर्वात आधी काकडी किसून घ्या. त्याचा रस काढा. कापसाच्या बॉलचा वापर करून, रस तुमच्या संपूर्ण त्वचेवर लावा. ते सुकू द्या आणि धुवा. अतिरिक्त फायद्यांसाठी तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस देखील घालू शकता.

बेसन आणि हळद

हळद ही त्वचा उजळण्यासाठी एक उत्कृष्ट एजंट आहे. बेसन प्रभावीपणे त्वचेला मऊ करते. एक कप बेसनामध्ये १ चमचा हळद घाला.थोडे पाणी किंवा दूध घालून पातळ पेस्ट बनवा.हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लावा आणि ते कोरडे होऊ द्या, नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने घासून काढा.याचा नियमित वापर केल्याने तुमच्या त्वचेवरील टॅन निघून जाईल.

बटाट्याचा रस

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा रस खूप प्रभावी आहे. डोळ्यांभोवतीचे काळे वर्तुळ दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. बटाट्याचा रस एक उत्तम ब्लीचिंग एजंट म्हणून देखील ओळखले जाते. कच्च्या बटाट्याचा रस काढून तो थेट तुमच्या त्वचेवर लावा. यामुळे टॅनिंग दूर होईल. त्यांना 1० ते 12 मिनिटे तसेच राहू द्या आणि सुकल्यानंतर धुवा.

मिल्क क्रीम आणि स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्याचे गुणधर्म असतात. दुधाच्या क्रीमचे मलईदार गुणधर्म त्वचेत खोलवर ओलावा साठवतात, ज्यामुळे त्वचा कोमल आणि निरोगी दिसते.काही पिकलेल्या स्ट्रॉबेरी घ्या आणि त्यांना काट्याने चांगले मॅश करा.त्यात 2 चमचे फ्रेश क्रीम घाला आणि चांगले फेटून घ्या. हे चेहऱ्यावरील टॅन दूर करायला मदत करते. त्वचेवर लावा आणि 15-2० मिनिटे तसेच राहू द्या.

हेही वाचा : Health Tips : उन्हाळयात कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे


Edited By : Prachi Manjrekar

Manini