Saturday, March 15, 2025
HomeमानिनीHoli Skin Care: या सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील पक्का रंग असा काढा

Holi Skin Care: या सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील पक्का रंग असा काढा

Subscribe

लवकरच होळी येणार असून हा सण रंगांचा आणि आनंदाचा आहे. जो आपण आपल्या कुटुंबियांसह किंवा मित्रपरिवारासह जल्लोषात साजरा करतो. परंतु होळी खेळताना आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. होळीच्या रंगांमध्ये अनेक रासायनिक रंग मिसळलेले असतात. या रंगांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते. आपली त्वचा कोरडी, निस्तेज, त्वचेची एलर्जी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात कोणत्या सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील पक्का रंग आपण काढू शकतो.

मुलतानी मिट्टी

चेहऱ्यावर मुलतानी मिट्टी लावा. बऱ्याचवेळा आपण फेसपॅक म्हणून मुलतानी माती वापरतो. परंतु तुम्हाला जर कायमचे डाग योग्यरित्या साफ करायचे असतील तर तुम्ही यासाठी मुलतानी माती वापरू शकता.स्क्रब म्हणून याचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा दूर होईल.

नारळाच्या तेलाचा वापर करा

चेहऱ्यावरील होळीचे रंग काढून टाकण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल देखील वापरू शकता.यामुळे, कायमचे रंग देखील सहजपणे निघून जातील.यासाठी आधी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर, चेहऱ्यावर नारळाचे तेल लावा आणि चांगले मसाज करा. होळी खेळायला जाण्यापूर्वी नारळाचे तेल लावा. मसाज करून झाल्यावर नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉश लावा. पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील सर्व रंग कायमचा रंग निघून जाईल.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • रंग लावण्यापूर्वी चेहऱ्यावर तेल लावा. यामुळे रंग जास्त चिकटणार नाही.
  • होळी खेळ्यापूर्वी आधी रंगाची गुणवत्ता तपासून घ्या.
  • रंग जास्त काळ चेहऱ्यावर लावू नका.
  • चेहऱ्यावरील होळीचे रंग काढून टाकण्यासाठी, त्वचेवर थेट साबण किंवा फेस वॉश लावा.
  • फेस वॉश किंवा साबण लावल्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा रंग दिसणार नाही.
  • यामुळे तुम्हाला त्वचेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावर फेशियल वॅक्स करणे योग्य आहे का ?


Edited By : Prachi Manjrekar

Manini