आज सर्वत्र भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक कार्यक्रमांच आयोजन केले जाते. तसेच सार्वजनिक सुट्टी असल्याने घरात विविध पदार्थ बनविले जातात. तुम्ही हे पदार्थ स्पेशल प्रजासत्ताक दिनाचे करू शकता. यासाठी तुम्हाला या पदार्थांमध्ये झेंड्याचे रंग अर्थात केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊयात, स्पेशल तिरंगी स्नॅक्स
तिंरगी इडली –

इडलीचा नाष्टा हा हेल्दी असतो. त्यामुळे हमखास घराघरात बनविला जातो. यासाठी तुम्हाला इडलीच्या पिठात तीन रंगाचा वापर करावा लागेल. तुम्हाला बाजारातील विकत रंग वापरायचे नसतील तर केशरी रंगासाठी गाजराचे पाणी, हिरव्या रंगासाठी पुदिना किंवा कोथिंबीरची पेस्ट वापरता येईल.
तिरंगी डोसा –

इडलीप्रमाणेच तुम्ही डोश्याच्या पिठात खायचे रंग टाकून डोसा तयार करू शकता.
तिरंगी सॅंडविच –

तुम्ही तीन रंगाचे सॅंडविच तयार करू शकता. यासाठी ब्रेड स्लाइसला तीन रंगाचे पदार्थ तुम्हाला वापरावे लागतील. हे हटके सॅंडविच लहान मुलांना खूपच आवडेल.
तिरंगी कुल्फी –

तिरंगी कुल्फी मुलांना खूपच आवडेल. कारण आईस्क्रीम लहान मुलांची आवडती असते. यासाठी क्रीम दूध, साखर, केशर, ग्रीन फूड कलर, बदाम आणि वेलचीचा वापर करावा लागेल.
तिरंगी जिलेबी –

कोणताही सण असला की, घरात गोडाधोडाचे बनविले जाते. तुम्ही तीन रंगाची जिलेबी बनवू शकता.
तिरंगा भात –

तिरंगा पुलाव तयार करण्यासाठी तांदूळ अर्धवट शिजल्यानंतर त्यात हिरवा आणिकेशरी खायचा रंग घाला. तुमचा प्रजासत्ताक दिन स्पेशल तिरंगी भात तयार झाला आहे.
हेही पाहा –