Saturday, February 15, 2025
HomeमानिनीRepublic Day Look : प्रजासत्ताक दिनासाठी सेलिब्रिटी स्टाइल आऊटफिट आयडियाज

Republic Day Look : प्रजासत्ताक दिनासाठी सेलिब्रिटी स्टाइल आऊटफिट आयडियाज

Subscribe

लोहरी आणि मकर संक्रांतीनंतर आता प्रजासत्ताक दिनाची तयारी सगळीकडे पाहायला मिळते. प्रजासत्ताक दिन हा आपल्या राष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा आणि एकात्मतेचा उत्सव आहे.या दिवशी सगळेजण तिरंग्याच्या रंगाचे कपडे परिधान करतात . या दिवशी काही खास कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. बऱ्याचदा आपण या कार्यक्रमाला तेच कपडे परिधान करतो. यावर्षी तुम्हाला काही हटके ट्राय करायचं असेल तर तुम्ही सेलिब्रिटीचे आऊटफिट ट्राय करू शकता.

जान्हवी कपूर

Republic day Dressजान्हवी कपूरचा हा लूक प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट आहे. जान्हवी कपूरच्या या ड्रेसला तिरंगी पट्टे आहेत. तुम्ही मिनिमल मेकअप करून हा लूक क्रिएट करू शकता.

सारा अली खान

republic day dressसारा अली खानची फॅशन प्रत्येक तरुणीला भुरळ पाडणारी असते. तुम्ही प्रजासत्ताक दिनाला तिचा सारखा हटके लूक करू शकता. साराने पांढऱ्या रंगाचा प्लाझो सेट घातला असून त्याची ओढणी तिरंग्या रंगाची आहे.

माधुरी दीक्षित

जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही या दिवशी माधुरी दीक्षित प्रमाणे ही साडी नेसू शकता. ही साडी प्रजासत्ताक दिनासाठी उत्तम आहे. माधुरीने सिल्क साडी नेसली असून या साडीला ऑरेंज रंगाची बॉर्डर आहे.

आलिया भट्ट

जर तुम्हाला काही हटके ट्राय करायचं असेल तर तुम्ही आलिया भट्टचा हा ड्रेस निश्चितपणे ट्राय करू शकता. हा लूक परिपूर्ण बनवण्यासाठी हिरवे कानातले, हिरवी टिकली घालू शकता.

अनन्या पांडे

अनन्या पांडेचा हा पांढरा कुर्ता सेट प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट आहे. प्रजासत्ताक दिनी तुम्ही पांढरा कुर्ता सेट घालू शकता. तुम्ही या ड्रेसवर ऑरेंज रंगाची ओढणी घेऊ शकता. तसेच या सह बांगड्या आणि अॅक्सेसरीजने लूक परिपूर्ण करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही प्रजासत्ताक दिना दिवशी सेलिब्रिटींचे हे आऊटफिट आयडियाज ट्राय करू शकता.

हेही वाचा : Winter Footwear Designs : हिवाळ्यासाठी खास फूटवेअर डिझाईन्स


Edited By : Prachi Manjrekar

Manini