तांदूळ नाही तर बटाट्या पासून बनवा झटपट ईडली

थालीपीठ , पराठा, सँडविच खाऊन जर तुम्हांला कंटाळा आला असेल तर बटाट्याची ईडली नक्की ट्राय करा

नाश्त्यामध्ये रोज काय बनवायचं हा प्रश्न महिला वर्गाला नेहमी सतावत असतो. त्यातच पोहे, उपमा, ईडली, डोसा, थालीपीठ , पराठा, सँडविच खाऊन जर तुम्हांला कंटाळा आला असेल तर बटाट्याची ईडली नक्की ट्राय करा. बनवण्यास झटपट आणि टेस्टी असलेली ही ईडली तब्येतीसाठीही फायदेशीर आहे.

साहीत्य- १ उकडलेला बटाटा, १ कप रवा, १ टीस्पून चन्याची डाळ, १/२ कप दही, १/२ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून जीरे एक चिमूट हींग, ७-८ कडी पत्त्याची पानं, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ टीस्पून ईनो, २ टेबलस्पून तेल और नमक

कृती-सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्याची साले काढून घ्या. नंतर ब्लेंडरमध्ये १/४ कप पाणी टाकून त्यात बटाटे टाकावे. त्याची स्नूदी बनवावी. नंतर एका फ्राय पॅनमध्ये जीरे मोहरी हींग, चना डाळ, कडीपत्ता टाकून फ्राय करावे. नंतर मंद आचेवर या मसाल्यात रवा टाकून परतून घ्यावा. हे मिश्रण एका बाऊलमध्ये घ्यावे. रवा थंड झाल्यावर त्यात बटाट्याची स्मूदी, दही, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाणी, ईनो टाकावे. ईडली पात्रात टाकून त्याच्या ईडल्या बनवाव्यात. गरमगरम ईडली हिरव्या चटणीबरोबर .खाण्यास द्यावी