Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीMorning Walk : थंडीत कोणत्या वेळी करावे वॉकिंग?

Morning Walk : थंडीत कोणत्या वेळी करावे वॉकिंग?

Subscribe

चालणे शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे दिवसातून थोडा वेळ का होईना चालण्याचा व्यायाम करावा, असे सांगितले जाते. चालण्याने स्नायू मजबूत होतात, हाडांचे आरोग्य सुधारते, मानसिक आरोग्य सुधारते. तज्ञही व्यायाम प्रकारातील सर्वात सोपा व्यायाम चालणे असल्याने दररोज करण्याचा सल्ला देतात. पण, थंडीच्या दिवसात कडाक्याच्या थंडीत चालणे कठीण होते, आजारी पडण्याची शक्यता असते. साधारणपणे, सकाळी चालावे असे सांगितले जाते. पण, थंडीच्या दिवसात हे शक्य होईल असे नाही. त्यामुळे जाणून घेऊयात, थंडीत कोणत्या वेळी वॉकिंग करावे,

थंडीच्या दिवसात सकाळी मॉर्निग वॉकला निघणे कठीण असते. वातावरणात गारवा असल्याने स्तुती तर येतेच शिवाय उठायला होत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही सकाळी 6, 7 वाजता वॉकिंग न करता 10 ते 3 च्या दरम्यान चालायला जावे. सकाळचा वॉक कोवळे ऊन घेण्यासाठी केला जातो. कोवळे ऊन्हामुळे शरीराला व्हिटॅमिन D मिळते. व्हिटॅमिन D शरीरासाठी गरजेचे असते. थंडीच्या दिवसात कोवळे ऊन दुपारी 2 ते 3 पर्यत असते, त्यामुळे थंडीच्या दिवसात यावेळेत वॉक तुम्ही करू शकता.

मॉर्निग वॉक करताना हेही लक्षात घ्या- 

गरम कपडे – 

थंडीच्या दिवसात वॉक करताना तुम्ही गरम कपडे अवश्य घालावेत, जेणेकरून तुम्हाला थंडी वाजणार नाही, तुम्ही आजारी पडणार नाही. याशिवाय हातमोजे आणि कानटोपी सुद्धा घालावी.

शरीर ठेवा हायड्रेट –

थंडीच्या दिवसात वॉक करताना शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. निरोगी शरीरासाठी हे अत्यंत आवश्यक असते.

श्वसनासी संबंधित समस्या असल्यास टाळा –

याव्यतिरीक्त तुम्हाला जर दम्याचा त्रास असेल किंवा श्वसनासी संबंधित समस्या असतील तर अशा व्यक्तीने थंडीच्या दिवसात चालणे टाळावे.

वातावरणाचा अंदाज घ्या – 

जर वातावरणात खूपच गारवा असेल, कडाक्य़ाची थंडी पडली असेल अशावेळी तु्म्ही वातावरणाचा अंदाज घेऊन चालायला जावे.

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini