Friday, April 19, 2024
घरमानिनीFashionRipped जीन्स कशी धुवायची

Ripped जीन्स कशी धुवायची

Subscribe

आजकालच्या सर्वच तरुणी जीन्स घालतात. जीन्सचे विविध प्रकार, डिझाइन्स ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. जसा ट्रेंन्ड असतो त्यानुसार मार्केटमध्ये कपडे आपल्याला दिसतात. अशातच सध्या रिप्ड जीन्स घालणे फार लोकांना आवडते. ही जीन्स घातल्यानंतर तुम्हाला थोडं जज केलं जाऊ शकते. रिप्ड जीन्स ही फाटलेली असल्याने त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास ती खराब होऊ शकते. त्याचसोबत तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की, जीन्स कशी धुवावी. याच बद्दलच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खरंतर जेवढ्या कमी वेळा जीन्स धुवाल त्या तेवढ्याच अधिक काळ टिकतात. प्रत्येक जीन्सच्या मागे एक लेबल लावला जातो. त्यात त्या जीन्सची कशी काळजी घ्यावी याचे डिस्क्रिप्शन ही दिले जाते. नेहमीच लक्षात ठेवा की, जीन्स धुताना ब्लीचचा वापर कधीच करु नका. कारण कपड्यांना ब्लीच लागल्यानंतर त्याचा रंग फिकट पडतो.

- Advertisement -

कशी धुवाल रिप्ड जीन्स?


-रिप्ड जीन्स थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवा. त्यात लिक्विड डिटर्जेंटचा वापर करा.
-जवळजवळ १०-१५ मिनीटांनी ती पाण्याबाहेर काढा.
-यावेळी लक्षात असू द्या, रिप्ड जीन्स अधिक घासायची नाहीय. असे न केल्यास ती खराब होऊ शकते. हलक्या हाताने जीन्स धुवा.

- Advertisement -

मशीनमध्ये कशी धुवाल?


-जर तुम्ही जीन्स मशीनमध्ये धुण्याचा विचार करत असाल तर ती आधी उलट दिशेला करुन घ्या. जेणेकरुन त्यावर कोणताही रंग लागणार नाही.
-मशीनला डेलिकेटवर सेट करा आणि थंड पाणीच त्यात टाका.
-५-७ मिनिटांत तुमची जीन्स धुतली जाईल.


हेही वाचा- लिनेन साडीची अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini