Monday, March 17, 2025
HomeमानिनीRecipeRose Day Special Recipe : प्रेमात गोडवा आणतील कोकोनट रोझ लाडू

Rose Day Special Recipe : प्रेमात गोडवा आणतील कोकोनट रोझ लाडू

Subscribe

व्हॅलेंटाइन वीक सुरू होणार आहे. व्हॅलेंटाइन वीकचा पहिला डे रोझ डे ने सुरू होतो. तुम्ही नात्यात प्रेम आणण्यासाठी हा दिवस नक्कीच खास करू शकता. कोकोनट रोझ लाडू बनवून दोघांमधील प्रेम वाढवू शकता.

Prepare time: 15 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min

Ingredients

  • ओले खोबरे - 2 वाटी
  • सुकं खोबर - 1 वाटी
  • कंडेन्स मिल्क - अर्धा कप
  • रोझ सिरप - 1 चमचा
  • गुलाब जल - 2 चमचे
  • साखर - 1 ते 2 चमचे
  • तूप - 2 चमचे
  • ड्रायफ्रुट्स - अर्धी वाटी
  • गुलाबाच्या पाकळ्या

Directions

  1. कोकोनट रोझ लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी एका गरम कढईत 1 चमचा तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घ्यावेत.
  2. यानंतर त्याच कढईत 1 चमचा तूप पुन्हा टाकून ओले खोबरं आणि साखर मिक्स करून भाजून घ्यावे.
  3. ओले खोबरं भाजल्यावर त्यात कंडेन्स मिल्क, रोझ सिरप, गुलाबजल टाका आणि सतत ढवळत राहा.
  4. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स मिक्स करा.
  5. मिश्रण एका ताटात काढा आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत.
  6. सर्वात शेवटी लाडू सुक्या खोबऱ्यात घोळवून त्यावर एक गुलाबाची पाकळी लावावी
  7. अशा पद्धतीने तुमचे रोझ डे स्पेशल लाडू तयार झाले आहेत.

Manini