गुलाब पाणी काही लोक टोनरच्या रुपात वापरतात. ते गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केले जाते. याचा वापर करून त्वचेवरील पोर्स ओपन करणे, काळे डाग कमी करणे, सनबर्नला हाइड्रेट करणे आणि त्वचेला पोषण देण्यास मदत होऊ शते. गुलाब पाण्यात अँन्टीसेप्टिक गुण असतात, जे तुमच्या त्वचेसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरतात. ड्राय स्किन असलेल्यांनी स्किन केअर रुटीनमध्ये गुलाब पाण्याचा वापर करणे बेस्ट ऑप्शन आहे. गुलाब पाण्याचा कशा प्रकारे वापर करता येईल हे पाहूयात.
-शीट मास्कच्या रुपात
एका कॉटन पॅड घेऊन चेहऱ्याला गुलाब पाणी लावा. त्यावर आपले सीरम असणारे शीट मास्क लावा. गुलाब पाणी तुमच्या शीट मास्कच्या हाइड्रेटिंग गुणांना अधिक वाढवतात. शीट मास्क आणि गुलाब पाण्यामुळे तुमची त्वचा नरम, मऊ आणि उजळ दिसू लागते.
-टोनरच्या रुपात वापर
तुम्ही महागडे टोनर वापरण्याऐवजी गुलाब पाण्याचा टोनर म्हणून वापर करू शकता. असे केल्याने एक्ने प्रोनच्या समस्येपासून दूर राहता. त्याचसोबत गुलाब पाणी अतिरिक्त सीबम प्रोडक्शनला नियंत्रित करण्यास मदत करतात.
-गुलाब पाणी आणि ग्लिसरिन
स्किनला मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही ग्लिसरिनमध्ये गुलाब पाणी मिक्स करू शकता. ग्लिसरिन तुमच्या स्किनध्ये ओलसरपणा टिकवून ठेवतो. त्यामुळे ड्राय स्किनसाठी हे फायदेशीर ठरेल.
-गुलाब पाणी आणि एसेंशिल तेल
गुलपाण्यात लेवेंडर अथवा केमोमाइल सारखे एसेंशियल तेलाचे काही थेंब टाकू शकता. या तेलामध्ये स्किनला आराम देणारे गुण असतात. त्यामुळे याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याची स्किन उजळ दिसेल.
हेही वाचा- फंक्शनला जाण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी