प्रत्येकजण हा दिसायला सुंदरच असतो. मात्र याचे सौंदर्य अधिक वाढावे म्हणून आपण काही प्रकारच्या गोष्टी करतो. तर गोल चेहऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास तर यावर प्रत्येक हेअरस्टाइल ही सूट होते. मात्र काही हेअर मिस्टेक्समुळे तुमचा लूक बिघडला जाऊ शकतो.
काही वेळेस आपण दुसऱ्यांना पाहून हेअर स्टाइल करतो. मात्र असे कधीच करू नये. अशातच गोल चेहरा असेल तर कोणत्या प्रकारची हेअर स्टाइल करावी याच बद्दलच्या टीप्स आपण आज पाहणार आहोत.
-गोल चेहरा अधिक चब्बी असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चेहऱ्यावर स्लीक बॅक हेअर स्टाइल अत्यंत सुंदर दिसते.
-या चेहऱ्यावर पोनी टेल बांधताना केस अधिक घट्ट बांधू नका. अन्यथा तुमचे कपाळ रुंद दिसेल.
-याव्यतिरिक्त केस अधिक घट्ट बांधल्यास ते तुटण्याची शक्यता असते.
गोल चेहऱ्यासाठी हेअर स्टाइल करताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-गोल चेहऱ्यावर हेअर स्टाइल करताना केस घट्ट बांधल्यास तुम्ही विचित्र दिसाल.
-हेअर स्टाइल निवडताना केसांना बाउंस जरुर द्या. जेणेकरुन तुमच्या केसांसाठी केलेली हेअर स्टाइल तुमच्या चेहऱ्याला मॅच करेल.
-चेहऱ्याचा आकार आकर्षक दिसावा म्हणून पुढील बाजूल फ्लिक्स जरुर ठेवा
-तुम्ही केस हेअर कर्लरच्या मदतीने बाउंसी लूक देऊ शकता.
-जर तुमची केस पातळ असतील तर बाउंसी लूक देण्यासाठी बॅक कॉम्ब करू शकता.
हेही वाचा- फेस्टिव्ह ग्लो साठी फॉलो करा शहनाज हुसैन च्या ‘या’ टीप्स